IND vs NZ Test: न्यूझीलंडच्या कर्णधाराची टीम इंडियाला खुली वॉर्निंग, मॅचच्या आदल्या दिवशी काय म्हणाला?

IND vs NZ 1st Test: भारत न्यूझीलंड यांच्यात कसोटी सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. या मालिकेपूर्वी न्यूझीलंडचा कर्णधाराने पत्रकार परिषदेत काय म्हटलं ते पाहा...

IND vs NZ Test: न्यूझीलंडच्या कर्णधाराची टीम इंडियाला खुली वॉर्निंग, मॅचच्या आदल्या दिवशी काय म्हणाला?
| Updated on: Nov 18, 2026 | 3:30 PM

IND vs NZ 1st Test: न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी आपल्या संघाच्या संयोजनाबद्दल महत्त्वपूर्ण माहिती उघड केली आहे. त्याने स्पष्ट केले की, त्याचा संघ वेलिंग्टन येथील पहिल्या कसोटीत तीन वेगवान गोलंदाज आणि एका अष्टपैलू खेळाडूसह खेळेल. बेसिन रिझर्व्ह येथे वेगवान गोलंदाजांना मोठी साथ मिळेल, कारण भारतीय संघही चार वेगवान गोलंदाजांना मैदानात उतरवणार आहे.

न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम बुधवारी एका पत्रकार परिषदेत म्हणाला, “आम्ही तीन वेगवान गोलंदाज आणि एका गोलंदाजी अष्टपैलू खेळाडूसह खेळू. काईल जेमिसन आणि मॅट हेन्री यांचे खेळणे निश्चित मानले जात आहे, परंतु तिसऱ्या वेगवान गोलंदाजाबाबत कोणतीही स्पष्टता नाही. वेलिंग्टन कसोटीपूर्वी न्यूझीलंडसाठी चांगली बातमी ही आहे की, हेन्री डोक्याला झालेल्या दुखापतीतून (कन्कशन) सावरला आहे. एकदिवसीय मालिकेदरम्यान त्याला दुखापत झाली होती.”

Loading...

हेन्रीच्या पुनरागमनाबद्दल टॉम लॅथम म्हणाला, “मॅट तंदुरुस्त आहे. मला आशा आहे की तो कसोटी क्रिकेटमध्ये परतण्यासाठी उत्सुक असेल.” जेमिसनबद्दल तो म्हणाला, “त्याने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. त्याने गेल्या काही आठवड्यांपासून खूप मेहनत घेतली आहे.”

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेबद्दल टॉम लॅथम म्हणाले, “माझे लक्ष डब्ल्यूटीसी गुणतालिकेवर नाही. जे आमच्या नियंत्रणात आहे त्यावर आम्ही लक्ष केंद्रित करू. आमच्या खेळण्याच्या शैलीत बदल होणार नाही.” न्यूझीलंड डब्ल्यूटीसी गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. भारत चौथ्या स्थानावर आहे.

भारतीय कसोटी संघ

शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, देवदत्त पडिक्कल, यशस्वी जैस्वाल, साई सुदर्शन, अंशुल कंबोज, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, आकाश दीप, गुरनूर ब्रार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.

न्यूझीलंड कसोटी संघ

टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हन कॉनवे, डॅरिल मिचेल, हेन्री निकोल्स, जेकब डफी, मॅट हेन्री, विल यंग, ​​टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), काईल जेमिसन, ग्लेन फिलिप्स, ब्लेअर टिकनर, डीन फॉक्सक्रॉफ्ट, सचिन रवींद्र, नॅथन स्मिथ.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us