…अन् पत्रकार परिषद सुरु असताना वॉटलिंगने विल्यमसनचा ऑटोग्राफ घेतला, जबराट व्हिडीओ ICC कडून शेअर!

| Updated on: Jan 06, 2021 | 7:05 PM

न्यूझीलंड संघाचा विकेटकिपर बीजे वॅटलिंगने प्रेस कॉन्फरन्स सुरु असतानाच मध्ये येऊन विल्यमसनचा ऑटोग्राफ घेतला.

...अन् पत्रकार परिषद सुरु असताना वॉटलिंगने विल्यमसनचा ऑटोग्राफ घेतला, जबराट व्हिडीओ ICC कडून शेअर!
Follow us on

NZ Vs Pakन्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा एक डाव आणि 176 रन्सनी धुव्वा उडवत पाकिस्तानला लोळवलं. पाकिस्तानविरुद्ध रेकॉर्डब्रेक कामगिरी करुन कसोटी क्रिकेटच्या इतिहासात न्यूझीलंड पहिल्यांदाच टेस्ट रँकिंगमध्ये नंबर एक वर विराजमान झाला आहे. विजयी आनंदोत्सव साजरा केल्यानंतर विल्यमसन पत्रकार परिषदेत बोलत असताना क्रिकेटरसिकांना एक विलोभणीय दृश्य बघायला मिळालं. न्यूझीलंड संघाचा विकेटकिपर बीजे वॉटलिंगने प्रेस कॉन्फरन्स सुरु असतानाच मध्ये येऊन विल्यमसनचा ऑटोग्राफ घेतला. (New Zealand WC Watling To take Captain kane Williamson Press Conference)

दुसऱ्या कसोटी सामन्यात धुव्वादार बॅटिंगने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या तसंच डबल सेंच्युरी ठोकणाऱ्या केन विल्यमसनला मॅन ऑफ द टूर्नामेंट पुरस्काराने गौरविण्यात आले. तर काइल जॅमिसनने कसोटी सामन्य्त 11 विकेट घेत पाकिस्तानच्या संघाचं कंबरडं मोडलं. त्याला या कामगिरीबद्दल मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला.

प्रेस कॉन्फरन्स सुरु असतानाच विकेटकिपर बीजे वॉटलिंगने विल्यमसनचा ऑटोग्राफ मागितला. झाल्या प्रकाराने विल्यमसनही अचंबित झाला. वॉटलिंगनेच्या कृतीने क्रिकेट चाहत्यांनी मने जिंकली. आयसीसीनेही या व्हिडीओची दखल घेतली. या हळव्या प्रसंगाचा व्हिडीओ आयसीसीने शेअर केला आहे.

कर्णधार केन विल्यमसनच्या डबल सेंच्युरींच्या जोरावर पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत न्यूझीलंडने ऐतिहासिक विजय मिळवत मालिका नावावर केली. पाठीमागच्या 10 वर्षांमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये शीर्षस्थानी आलेली न्यूझीलंड ही सहावी टीम आहे. आयसीसीने ट्विट करुन म्हटलंय, पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बहारदार कामगिरी करुन न्यूझीलंडने कसोटी क्रिकेट रँकिंगमध्ये नंबर एकवर झेप घेतली आहे.

(New Zealand WC Watling To take Autograph Captain kane Williamson Press Conference)

हे ही वाचा

Aus vs Ind 3rd test | अश्विन-जाडेजा पुन्हा कांगारुंना नाचवणार, सिडनीचे पिच क्युरेटर काय म्हणतात?

Aus vs Ind 3rd Test | सिडनीच्या मैदानात येणाऱ्यांना मास्क बंधनकारक, प्रेक्षकांवर तगड्या दंडाची तरतूद