Nita Ambani : पुढच्या सीझनमध्ये नव्या नावासह मैदानात उतरणार नीता अंबानींची टीम, घेतला मोठा निर्णय

नीता अंबानी यांनी मोठा निर्णय घेतला असून त्या त्यांच्या संघाचे नाव बदलणार आहेत. पुढच्या हंगामात त्यांचा संघ नवीन नावाने मैदानात उतरणार आहे. काय असेल नवं नाव ?

Nita Ambani : पुढच्या सीझनमध्ये नव्या नावासह मैदानात उतरणार नीता अंबानींची टीम, घेतला मोठा निर्णय
अंबानी कुटुंबाने घेतला मोठा निर्णय
Image Credit source: PTI
| Updated on: Aug 22, 2025 | 10:51 AM

मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्या त्यांच्या संघाचे नाव बदलणार आहेत. पुढील हंगामात, त्यांचा संघ नवीन नावाने मैदानात उतरेल. या सीझनमध्ये त्याचा संघ इंग्लंडमध्ये चमकदार कामगिरी करत असून, 6 पैकी 5 सामन्यांमध्ये शानदार विजय मिळवून पॉइंट टेबलमध्ये ते अव्वल स्थानावर पोहोचले आहेत. असे असूनही, 2026 मध्ये त्याच्या संघाचे ओव्हल इनव्हिन्सिबल्स हे नाव बदलले जाईल. इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या द हंड्रेड लीगमध्ये ओव्हल इन्व्हिन्सिबल्स संघात मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्सची 49 टक्के हिस्सेदारी आहे.

ओव्हल इनव्हिन्सिबल्सचं बदलणार नाव

रिपोर्ट्सनुसार, अंबानी कुटुंबाने द हंड्रेड लीग टीम ओव्हल इनव्हिन्सिबल्सचे नाव बदलायचा निर्णय घेतला आहे. यामुळे 2026 मध्ये या टीमचे नाव एमआय लंडन असे बदलले जाईल. मुंबई इंडियन्सचे मालक असलेल्या अंबानींनी या वर्षाच्या सुरुवातीला 123 दशलक्ष युरोमध्ये या संघातील 49 टक्के हिस्सा खरेदी केला होता. नाव बदलल्यानंतर, एमआय लंडन हे अंबानी कुटुंबाच्या मालकीच्या संघांच्या यादीत एक नवीन नाव जोडले जाईल. यामध्ये एमआय केपटाऊन, मुंबई इंडियन्स, डब्ल्यूपीएलमधील मुंबई इंडियन्स, एमआय न्यू यॉर्क, एमआय एमिरेट्स यांचा समावेश आहे.

MI ब्रँडबद्दल अंबानी कुटुंबाला उत्सुकता

पुढील वर्षी सरे संघाच्या इच्छेविरुद्ध ओव्हल इनव्हिन्सिबल्सचे नाव बदलून एमआय लंडन केले जाईल, असे वृत्त आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) द हंड्रेडमध्ये काउंटी नावांचा वापर करण्यास मनाई केली आहे. अशा परिस्थितीत, जर संघाचे नाव बदलले तर ईसीबीला त्यात कोणतीही अडचण नाही. रिपोर्टनुसार, अंबानी कुटुंबाला एमआय ब्रँडची खूप उत्सुकता असून या संघाचे नाव एमआय ओव्हलऐवजी एमआय लंडन असावे असा त्यांचा आग्रह होता.

द हंड्रेडमध्ये ओव्हल इन्व्हिन्सिबल्सची उत्कृष्ट कामगिरी

द हंड्रेडमध्ये ओव्हल इन्व्हिन्सिबल्स संघ सध्या शानदार कामगिरी करत आहे आणि पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. ट्रेट रॉकेट्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात, ओव्हल इनव्हिन्सिबल्सच्या जॉर्डन कॉक्स आणि सॅम करन यांनी शानदार फलंदाजी केली आणि 11 चेंडू शिल्लक असताना 6 गडी राखून संघाला शानदार विजय मिळवून दिला. ओव्हल इनव्हिन्सिबल्सने आतापर्यंत 6 पैकी 5 सामने जिंकले आहेत. सॅम बिलिंग्ज हा या संघाचा कर्णधार आहे.