
कोपो अमेरिका (Copa America 2021) या मानाच्या स्पर्धेत अखेर मेस्सीच्या अर्जेंटीना संघाने ब्राझीलवर विजय मिळवला विजयानंतर अर्जेंटीना संघाने मैदानावर मोठा जल्लोष केला यावेळी कर्णधार लिओनल मेस्सी (Lionel Mess) विजयी चषक उचलून संघासोबत दिसत आहे.

जगातील आघाडीचा खेळाडू असणाऱ्या मेस्सीच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत. त्याने त्याचा क्लब बार्सिलोनासाठी (FCB) अनेक स्पर्धांमध्ये विजय मिळवून दिला आहे. पण देशासाठी मेस्सीला अजूनपर्यंत काही खास कामगिरी करता आली नव्हती. पण अखेर कोपा अमेरिका या मानाच्या स्पर्धेत संघाला विजय मिळवून दिल्यानंतर आनंदी झालेल्या मेस्सीला अश्रूही अनावर झाले. त्याला मैदानावरच गहिवरुन आले. यावेळी त्याचे संघसोबती त्याला सावरत आनंद व्यक्त करु लागले.

अत्यंत अटीतटीच्या आणि महत्त्वाच्या सामन्यानंतर मैदानावरील प्रतिस्पर्धी असणारे नेयमार आणि मेस्सी यांनी निवांत बसून फोटोसेशन केले.

सामना जिंकल्यानंतर मेस्सी सोबती खेळाडू डी-पॉल सोबत मैदानावर सेल्फी घेताना.

विजयानंतर सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते ती विजयी ट्रॉफी. याच ट्रॉफीला मिळवण्यासाठी सर्व स्पर्धा असते. ती मिळाल्यानंतर मेस्सीने कपचे चुंबन घेत आनंद साजरा केला.

कर्णधार लिओनल मेस्सीसाठी (Lionel Messi) हा विजय अत्यंत महत्त्वाचा असल्याने विजयानंतर सर्वांनीच मेस्सीला अक्षरश: डोक्यावर घेतले. यावेळी मेस्सीला घेऊन जल्लोष करताना संघ

संघाच्या विजयात खेळाडूंस मैदानाबाहेर राहून महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सपोर्ट स्टाफचेही तितकेच महत्त्व असते. त्यामुळे विजयानंतर संपूर्ण संघाने ट्रॉफीसह फोटो काढला. ज्यात सपोर्ट स्टाफही दिसून येत आहे.