
सामन्यांदरम्यान ऑन आणि ऑफ फिल्ड खेळाडूंना अनेकदा टीकांचा सामना करावा लागतो. काही चाहत्यांचा खेळाडूंसोबत सेल्फी घेण्याचं स्वप्न असतं. तर काहींना त्यांची ऑटोग्राफ हवी असते. खेळाडू मोकळ्या वेळात तसेच शक्य तसं सामन्यादरम्यान खेळाडूंची इच्छा पूर्ण करतात. मात्र काही हुल्लडबाज चाहते आपले रंग दाखवतात. हे चाहते खेळाडूंवर वाटेल तशी टीका करतात. एका चाहत्याला फुटबॉलपटू इनाकी विलियम्स याच्यावर वर्णभेदी टीका करणं चांगलंच भोवलं आहे. बार्सिलोनाच्या न्यायालयाने या चाहत्याला एका कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच 1 लाख रुपये दंडही ठोठावला आहे. (Photo Credit : GETTY)

एका चाहत्याने आजपासून 5 वर्षांपूर्वी 2020 साली आरसीडीए स्टेडियममध्ये इनाकी विलियम्स याच्यावर वर्णभेदी टीका केली होती. मात्र त्यानंतरही या चाहत्याला स्पॅनिश कायद्यानुसार तुरुंगात जावं लागणार नाही, त्याचं कारणही असचं आहे. या चाहत्याला सुनावण्यात आलेली शिक्षा 2 वर्षांपेक्षा कमी आहे. तसेच त्या चाहत्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. (Photo Credit : INSTAGRAM)

मात्र असं असलं तरी या चाहत्याची मस्ती चांगलीच जिरवण्यात आली आहे. या चाहत्यावर 3 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे या चाहत्याला 3 वर्ष आरसीडीए फुटबॉल स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाणार नाही. या निर्णायाचं स्वागत करण्यात आलं आहे. (Photo Credit : INSTAGRAM)

इनाकी विलियम्स याचा पगार 116 कोटी इतका आहे. इनाकी बिलबाओचा सर्वात महागडा खेळाडू आहे. इनाकी घानासाठी खेळतो. तसेच इनाकी याच्याकडे स्पॅनिशचं नागरिकत्व आहे. (Photo Credit : INSTAGRAM)

खेळ कोणताही असो खेळाडूंना कायमच अशाप्रकारच्या टीकेचा सामना करावा लागला आहे. मात्र स्पॅनिश फुटबॉलपटूंना अनेकदा वर्णभेदी टीकेचा सामना करावा लागला आहे. यातील अनेक प्रकरणं न्यायालयापर्यंत गेली आहेत. विनीसीउस जूनियर याच्यावर गेल्या वर्षी 2024 मध्ये अशाचप्रकारे टीका करणाऱ्या तिघांना 8 महिने जेलमध्ये काढावे लागले होते. (Photo Credit : INSTAGRAM)