‘मी लियोनल मेस्सीची…’, चाहत्यांच्या गोंधळानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा माफीनामा

लियोनल मेस्सी हा भारतीयांचा आवडता फुटबॉलपटून आहे. त्यामुळे भारतात फुटबॉल जरी लोकप्रिय नसला तरी त्याचे लाखो चाहते. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्साह होता. मात्र सर्व उत्साहावर विरजण पडलं असंच म्हणावं लागेल.

मी लियोनल मेस्सीची..., चाहत्यांच्या गोंधळानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा माफीनामा
'मी लियोनल मेस्सीची...', चाहत्यांच्या गोंधळानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उचललं कठोर पाऊल
Image Credit source: PTI/TV9 HIndi
| Updated on: Dec 13, 2025 | 3:01 PM

फुटबॉलपटू लियोनल मेस्सी याचे संपूर्ण जगभरात चाहते आहेत. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडते. भारतातही त्याचे लाखो चाहते आहेत. त्यामुळे मेस्सी भारतात येणार म्हंटलं तर चाहत्यांची गर्दी होणार यात काही शंका नाही. लियोनल मेस्सीने ‘GOAT इंडिया टूर 2025’ कार्यक्रमांतर्गत पहिल्या दिवशी कोलकात्याला हजेरी लावली. चाहत्यांनी मेस्सीला पाहण्यासाठी 4 हजारापासून 12 हजारापर्यंत तिकीट खरेदी केले होते. पण चाहत्यांना आपल्या आवडत्या खेळाडूला काही पाहता आलं नाही. कारण मेस्सी फक्त 10 ते 15 मिनिटं स्टेडियममध्ये थांबला आणि निघून गेला. त्यामुळे चाहत्यांचा संताप झाला आणि त्यांनी बाटल्या फेकण्यास सुरुवात केली. इतकंच काय तर काही चाहते बॅरिकेट्स तोडून थेट मैदानात घुसले. तसेच आयोजकांविरुद्ध घोषणाबाजीही केली.

लियोनल मेस्सीच्या चाहत्यांची गर्दी आणि अव्यवस्था पाहून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही नाराजी व्यक्त केला. त्यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत या घटनेला दुर्देवी असल्याचं म्हंटलं आहे. “या दुर्दैवी घटनेबद्दल मी लियोनल मेस्सीची तसेच सर्व क्रीडाप्रेमींची आणि त्यांच्या चाहत्यांची माफी मागते. मी न्यायमूर्ती (निवृत्त) आशिष कुमार राय यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती स्थापन करत आहे. यात गृह आणि पर्वतीय व्यवहार विभागाचे मुख्य सचिव आणि अतिरिक्त मुख्य सचिव हे सदस्य असतील. ही समिती घटनेची सविस्तर चौकशी करेल, जबाबदारी निश्चित करेल आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना सुचवेल. पुन्हा एकदा, मी सर्व क्रीडाप्रेमींची मनापासून माफी मागते.”, असं ट्वीट त्यांनी केलं आहे.

दुसरीकडे, भाजपाने पश्चिम बंगालमधील ममता सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. भाजपा प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी सांगितलं की, “आंतरराष्ट्रीय पातळीवर पार लाज गेली. मेस्सीसारख्या जागतिक दिग्गज व्यक्तीचा समावेश असलेल्या कार्यक्रमात प्रचंड गर्दी होण्याची अपेक्षा होती, तरीही कोणतेही नियोजन आणि किमान सुरक्षा व्यवस्था नव्हती. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी कार्यक्रमाचे आयोजन किंवा व्यवस्थापनही करू शकत नाहीत. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना घेरले आणि चाहत्यांना आत जाण्यापासून रोखले गेले. चाहत्यांना किंवा आलेल्या पाहुण्यांना काही झाले असते तर?”