Lionel Messi In India : लियोनल मेस्सीचा भारत दौरा, 3 दिवसात 4 शहरात असं असेल वेळापत्रक
अर्जेंटीनाचा स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सी तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात चार वेगवेगळ्या शहरात भेटी देणार आहे. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बॉलिवूड कलाकारांची भेट घेणार आहे. जाणून घ्या संपूर्ण शेड्यूल

अर्जेंटीनाचा स्टार फुटबॉलपटूचा नियोजित भारत दौरा 13 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. 13 डिसेंबर ते 15 डिसेंबर असे तीन दिवस भारतात असणार आहे. लियोनल मेस्सीचा तीन दिवसात चार शहरात दौरा होणार आहे. 2011 नंतर पहिल्यांदाच लियोनल मेस्सी भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात कोलकाता, हैदराबाद, मुंबई आणि दिल्ली दौरा करणार आहे. त्यामुळे फुटबॉलप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. कारण लाडक्या फुटबॉल स्टारचं जवळून दर्शन घेता येणार आहे. या दौऱ्याला ‘GOAT India Tour’ असं नाव दिलं गेलं आहे. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, बॉलिवूड किंग शाहरूख खान आणि देशातील काही मुख्यमंत्री भेट देणार आहेत. माजी सहकारी आणि सुपरस्टार फुटबॉलपटू लुईस सुआरेझ आणि विश्वचषक विजेता रॉड्रिगो डी पॉल त्याच्यासोबत असणार आहे.
अमेरिकेतली मियामीहून उड्डाण घेतल्यानंतर मेस्सी आपल्या प्रवासात दुबईमध्ये काही वेळ विश्रांती घेईल. त्यानंतर 13 डिसेंबरला शनिवारी पहाटे 1.30 वाजता कोलकाता येथे पोहोचेल. सकाळी 9.30 ते 10.30 या दरम्यान चाहत्यांशी भेट आणि अभिवादन करेल. मेस्सीच्या पुतळ्याचे आभासी अनावरण करेल. 11.15 वाजता युवा भारती स्टेडियममध्ये जाईल. बॉलिवूड किंग शाहरुख खान तिथे असेल. त्यानंतर 12 ते 12.30 असा मैत्रीपूर्ण फुटबॉल सामना होईल. दुपारी 2 वाजता हैदराबादला प्रस्थान करेल.
13 डिसेंबरला संध्याकाळी 7 वाजता मेस्सी विरुद्ध रेवंत रेड्डी मैत्रीपूर्ण सामना हा राजीव गांधी स्टेडियममध्ये होईल. त्यानंतर संगीतमय मैफलीने दिवसाची सांगता होईल. 14 डिसेंबरला दुपारी 3.30 वाज मुंबईतील सीसीआयमधील पॅडल कपमध्ये सहभागी होईल. 4 वाजता सेलिब्रिटी फुटबॉल सामना होईल. वानखेडे स्टेडियमवरील कार्यक्रम आणि चॅरिटी फॅशन शो कार्यक्रमाचं आयोजन 5 वाजता असेल. 15 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेील. त्यानंतर दुपारी 1.30 वाजता अरूण जेटली स्टेडियमधील कार्यक्रमात भाग घेईल.
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी लियोनल मेस्सी भारतात येणार असल्याने फुटबॉलप्रेमींचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. पुढच्या वर्षी जून महिन्यात फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धा आहे. या स्पर्धेत एकूण 48 संघ पहिल्यांदा खेळणार आहेत. दुर्दैवाने यंदाही भारतीय फुटबॉल संघ पात्र ठरू शकलेला नाही. त्यामुळे क्रीडाप्रेमींना आता पुढच्या वर्ल्डकपची वाट पाहावी लागणार आहे. पण त्यासाठी चांगले फुटबॉलपटू संघात असणंही तितकंच गरजेचं आहे.
