AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

10 भागांची सर्वात भयानक हॉरर सीरिज, बघताना अंगावर येतो काटा, 3 वर्षांपासून चर्चेत, कमजोर लोकांनी बघू नये

10 भागांची सर्वात भयानक हॉरर सीरिज. ज्यामधील प्रत्येक प्रेक्षकांच्या अंगावर आणतो काटा. 3 वर्षांपासून या सीरिजने घातला आहे धुमाकूळ. कमजोर लोकांनी बघूच नये.

10 भागांची सर्वात भयानक हॉरर सीरिज, बघताना अंगावर येतो काटा, 3 वर्षांपासून चर्चेत, कमजोर लोकांनी बघू नये
Image Credit source: Social media
| Updated on: Mar 15, 2026 | 12:33 PM
Share

OTT च्या वाढत्या लोकप्रियतेमुळे प्रेक्षकांचा चित्रपट आणि मालिकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन मोठ्या प्रमाणात बदलला आहे. आता प्रेक्षक आपल्या सोयीनुसार कधीही आणि कुठेही आवडता चित्रपट किंवा सीरीज पाहू शकतात. यामध्ये हॉरर प्रकारातील कंटेंटमध्ये वेब सीरीजचे भाग भीती हळूहळू वाढवण्यास मदत करतात. प्रत्येक एपिसोडमध्ये कथेला नवे वळण मिळत असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता कायम राहते. त्यामुळेच जगभरातील विविध देशांमध्ये हॉरर चित्रपट आज मोठ्या प्रमाणात पाहिले जात आहेत.

सध्या भारतात हॉलीवूडच्या हॉरर चित्रपटांबरोबरच इंडोनेशियातील हॉरर कथा देखील प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होत आहेत. इंडोनेशियातील अनेक हॉरर चित्रपट आणि मालिकांमध्ये स्थानिक लोककथा, काळी जादू, अंधश्रद्धा आणि कौटुंबिक रहस्यांचा प्रभाव दिसून येतो. या कथा केवळ भीती निर्माण करण्यासाठी नसून त्या प्रेक्षकांना मानसिकदृष्ट्याही अस्वस्थ करणारे वातावरण तयार करतात.

2023 मधील भयानक सीरीज

अशीच एक इंडोनेशियन हॉरर मिनीसीरीज म्हणजे ‘ब्लड कर्स’. ही सीरिज 2023 मध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली होती. या सीरिजची कथा एका कुटुंबाभोवती फिरते. या कुटुंबात अचानक विचित्र आणि भीतीदायक घटना घडू लागतात. घरात मृत प्राणी सापडणे, कीटकांचा हल्ला होणे आणि नाल्यांमध्ये केसांचे गुच्छ सापडणे यामुळे घरातील वातावरण अधिकच भयावह बनते. काही काळानंतर त्या कुटुंबातील एका सदस्याचा अत्यंत भीषण मृत्यू होतो.

दरम्यान दुसऱ्या शहरातही एका कुटुंबासोबत अशाच प्रकारच्या घटना घडू लागतात. या दोन्ही कुटुंबांतील लोक या रहस्यमय घटनांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. तपास जसजसा पुढे सरकतो, तसतसे जुन्या वैरभावना, कौटुंबिक रहस्ये आणि काळ्या जादूशी संबंधित धक्कादायक सत्य समोर येऊ लागते.

प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद

हॉरर आणि थ्रिलर आवडणाऱ्या प्रेक्षकांनी ‘ब्लड कर्स’ या सीरिजला चांगला प्रतिसाद दिला. IMDb वर या सीरीजला सुमारे 7.3 रेटिंग मिळाले आहे. विशेषतः मालिकेचे सुरुवातीचे एपिसोड आणि शेवटचा भाग प्रेक्षकांना प्रचंड आवडला.

भारतात उपलब्ध नाही

ही सीरिज OTT प्लॅटफॉर्म Disney+ Hotstar वर प्रदर्शित करण्यात आली होती. मात्र तिचे स्ट्रीमिंग प्रामुख्याने काही देशांमध्ये मर्यादित ठेवण्यात आले होते. भारतासाठी या सीरिजचा स्ट्रीमिंग परवाना देण्यात आलेला नसल्यामुळे ती सध्या भारतात उपलब्ध नाही.

Follow Us
गॅससिलेंडरवरून राजकारण तापलं;अफवांमुळे रांगा लागल्याचा फडणवीसांचा दावा
गॅससिलेंडरवरून राजकारण तापलं;अफवांमुळे रांगा लागल्याचा फडणवीसांचा दावा.
इंधन टंचाईवरून राजकारण तापलं; संजय राऊतांचा मोदी-फडणवीसांवर निशाणा
इंधन टंचाईवरून राजकारण तापलं; संजय राऊतांचा मोदी-फडणवीसांवर निशाणा.
मुंबईच्या महापौर रितू तावडे वादाच्या भोवऱ्यात? 2017 चा मोठा नियम मोडला
मुंबईच्या महापौर रितू तावडे वादाच्या भोवऱ्यात? 2017 चा मोठा नियम मोडला.
LPG चं टेंशन संपणार! नागरिकांना मोठा दिलासा, चंद्रपूरमधून....
LPG चं टेंशन संपणार! नागरिकांना मोठा दिलासा, चंद्रपूरमधून.....
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट....
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट.....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात.....
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत.
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल.
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला.
गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार....
गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार.....