AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इस्लामिक राजवट कोसळताच मी इराणचे नेतृत्व करण्यास तयार… युद्धादरम्यान थेट घोषणा

इराण आणि अमेरिका युद्ध काही थांबण्याचे नाव घेत नाही. यादरम्यानच आता इराणमधून मोठी बातमी पुढे येत आहे. या युद्धात अमेरिकेला दणका बसताना दिसत आहे. इस्त्रायल आणि इराण दोघेही मोठे हल्ले करताना दिसत आहेत.

इस्लामिक राजवट कोसळताच मी इराणचे नेतृत्व करण्यास तयार... युद्धादरम्यान थेट घोषणा
Mojtaba Khamenei and Donald Trump
| Updated on: Mar 15, 2026 | 12:37 PM
Share

इराण आणि अमेरिका युद्ध टोकाला पोहोचले. 28 फेब्रुवारी रोजी इराणवर मोठा हल्ला करण्यात आला. या हल्ल्याला काही तासातच इराणकडून जोरदार उत्तर देण्यात आले आणि ज्या ज्या आखाती देशात अमेरिकेचे लष्कर तळ आहेत, अशा ठिकाणी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यांमुळे आखाती देशात तणाव वाढला. थेट दुबईच्या विमानतळावरही हल्ला करण्यात आला. अमेरिकेला स्वप्नातही वाटले नव्हते की, इराण इतक्या घातकपणे हल्ल्यांना प्रतिउत्तर देईल. अमेरिकन दूतावास कार्यालयही इराणच्या निशाण्यावर होती. आता होर्मुज समुद्रीमार्ग इराणकडून बंद करण्यात आला. इराणच्या या निर्णयामुळे जग संकटात आले. तेलाच्या किमती जागतिक बाजारात अस्थिर आहेत. यासोबतच तेलाचे भाव गगणाला पोहोचले आहेत. काही देशात गॅस आणि कच्चा तेलाचे मोठे संकट आहे. या युद्धात अमेरिकेवर प्रचंड दबाव आहे. अमेरिकेमुळे जग संकटात आहे. इराणचे सर्वाेच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्या तब्येतीलबद्दल विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत.

यादरम्यानच आता एक अत्यंत मोठी बातमी इराणमधून येत आहे. इराणचे निर्वासित युवराज रजा पहलवी यांनी मोठे विधान केले. रेजा पहलवी यांनी म्हटले की, इस्लामिक रिपब्लिकच्या पराभवानंतर मी लगेचच इराणच्या सत्तेचे नेतृत्व करण्यास तयार आहे. रेजा पहलवी यांनी केलेल्या या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. इराणचे सर्वाेच्च नेते म्हणून मोतजबा खामेनेई यांची निवड करण्यात आल्याने अमेरिकेने याला विरोध केला होता.

हेच नाही तर इराणच्या या देखील सर्वाेच्च नेत्याला ठारू करू असेही म्हटले होते. होर्मुज खाडी बंद केल्याने या युद्धात सध्याच्या स्थितीला इराणची पकड मजबूत दिसत आहे. अमेरिका अनेक प्रयत्न करत आहे, पण त्यांना यश मिळत नाही. अमेरिकेने काही देशांची होर्मुजच्या खाडीत मदतही मागितली आणि युद्धनाैका पाठवण्यास सांगितले.

चीन, फ्रान्स, ब्रिटन, दक्षिण कोरिया यासारख्या देशांना त्यांच्या युद्धनाैका होर्मुज खाडीत पाठवण्याची विनंती करण्यात आली. मात्र, अमेरिकेने मदत मागूनही एकही देश पुढे आला नाही. होर्मुज खाडीमध्ये इराणने अनेक देशाचे जहाजे उडवली आहेत. काहीच देशांना या खाडीतून इराण सुरक्षित मार्ग देताना दिसत आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल