Archery World Cup: ‘गोल्डन हॅट्रिक’ नंतर दीपिका कुमारीची आणखी एक कमाल, जागतिक क्रमवारीतही अव्वल!

भारताची आघाडीची महिला तिरंदाज दीपिका कुमारी (Deepika Kumari) याआधी देखील विश्व रँकिंगमध्ये अव्वल स्थानी पोहोचली होती. 2012 साली तिने हे यश मिळवत अव्वल स्थान गाठले होते.

Archery World Cup: ‘गोल्डन हॅट्रिक’ नंतर दीपिका कुमारीची आणखी एक कमाल, जागतिक क्रमवारीतही अव्वल!
deepika kumari
| Edited By: | Updated on: Jun 28, 2021 | 5:01 PM

मुंबई : विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत (Archery World Cup) भारतीय तिरंदाज दीपिका कुमारीने अप्रतिम कामगिरी करत तीन सुवर्णपदकं खिशात घातली. या कामगिरीमुळे टोक्यो ऑलिम्पिकआधीच (Tokyo Olympics) दीपिकाने तिंरदाजी स्पर्धेत आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. दीपिकाने महिला एकेरी, मिश्र आणि महिला सांघिक अशा तीन प्रकारात विजय मिळवत सुवर्णपदक आपल्या नावे केले. दरम्यान 27 जूनला ही कामगिरी करताच लगेचच 28 जूनलाच दीपिकाने तिरंदाजीच्या जागतिक रँकिंगमध्ये अव्वल स्थान पटकावत आणखी एक यश मिळवलं आहे. (Indian Archer Deepika Kumari Became number 1 in World After winning 3 Gold Medals in Archery World Cup)

एकाच दिवसांत तीन सुवर्णपदकं

झारखंडच्या रांची येथील 27 वर्षीय दीपिका कुमारीने रविवारच्या दिवसभरात आपल्या अप्रतिम प्रदर्शनामुळे विश्वचषक तिरंदाजी स्पर्धा गाजवून सोडली. तिने सलग तीन प्रकारांत विजय मिळवत सुवर्णपदक पटकावले. महिला एकेरीत रशियाच्या एलेना ओसिपोव्हाला नमवत दीपिकाने सुवर्णपदक मिळवले. त्यानंतर मिश्र प्रकारात पती अतनू दाससोबत नेदरलँड्सच्या जेफ व्हॅन डेन बेर्ग आणि गॅब्रियला श्लोएशर यांना नमवत सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर महिला सांघिकन प्रकारात अंकिता भगत आणि कोमालिका बारी यांच्या साथीने मेक्सिकोच्या तिरंदाजाना नमवत दीपिकाने आणखी एक सुवर्णपदक मिळवले.

हे ही वाचा :

VIDEO | सॅमसन ते पांड्या बंधू, क्रिकेटर्सची आवडती डिश Mock Duck, खुद्द शिखर धवनने दाखवली रेसिपी

‘द वॉल’ने ठरवली श्रीलंका दौऱ्याची रणनीती, द्रविड म्हणतो तीनच T20 सामने, सगळ्यांनाच कशी संधी मिळेल?

Video : भन्नाट मराठी गाण्यावर सूर्यकुमार यादवचा वर्कआऊट, व्हिडीओ पाहून चाहते खुश

(Indian Archer Deepika Kumari Became number 1 in World After winning 3 Gold Medals in Archery World Cup)