Tokyo Paralympics 2020: पॅरालिम्पिक्समध्येही यश मिळवण्यासाठी भारतीय खेळाडू सज्ज, वाचा संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

| Updated on: Aug 23, 2021 | 8:07 PM

भारताने रिओ पॅरालिम्पिक्स, 2016 मध्ये 2 सुवर्णपदकांसह एकूण 4 पदकं खिशात घातली होती. यंदाही भारताचे खेळाडू टोक्यो पॅरालिम्पिक्समध्ये टोक्यो ऑलिम्पिकप्रमाणे ऐतिहासिक कामगिरी करतील अशी आशा संपूर्ण भारत व्यक्त करत आहे.

Tokyo Paralympics 2020: पॅरालिम्पिक्समध्येही यश मिळवण्यासाठी भारतीय खेळाडू सज्ज, वाचा संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर
भारतीय खेळाडू टोक्यो पॅरालिम्पिक्ससाठी रवाना
Follow us on

Tokyo Paralympics 2020: टोक्यो ऑलिम्पिक 2020 (Tokyo Olympics 2020) स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत भारतीय खेळाडूंनी सात पदकं मिळवली. ज्यामध्ये एका सुवर्णपदकासह दोन रौप्य तर चार कांस्य पदकांचा समावेश होता. या यशस्वी कामगिरीनंतर आता टोक्यो पॅरालिम्पिकमध्येही अशीच कामगिरी करुन जास्तीत जास्त पदक मिळवण्यासाठी भारतीय पॅरा एथलिट्स सज्ज झाले आहेत. उद्यापासून (24 ऑगस्ट) टोक्योमध्येच पॅरालिम्पिक्स खेळांना (Tokyo Paralympics 2020) सुरुवात होणार आहे. तर भारताचे या स्पर्धेतील सामने खालीलप्रमाणे असतील…

25 ऑगस्ट
टेबल टेनिस
-पहिला सामना सोनलबेन मुधभाई पटेल
-दुसरा सामना- भाविना हसमुखभाई पटेल

27 ऑगस्ट
तिरंदाजी
-पुरुष गट- हरविंदर सिंह, विवेक चिकारा
-पुरुष गट- राकेश कुमार, श्याम सुंदर स्वामी
-महिला गट- ज्योती बालियान
-महिला गट – ज्योति बालियान आणि टीबीसी

27 ऑगस्ट
पॉवरलिफ्टिंग
-पुरुष- 65 किलो गट- जयदीप देसवाल
-महिला- 50 किलो गट- सकीना खातून

27 ऑगस्ट
स्विमिंग
-सुयश जाधव

28 ऑगस्ट
अ‍ॅथलेटिक्स
-पुरुष भालाफेक- रंजीत भाटी

29 ऑगस्ट
अ‍ॅथलेटिक्स
-पुरुष थाली फेक- विनोद कुमार
-पुरुष उंच उडी – निशाद कुमार, राम पाल

30 ऑगस्ट
अ‍ॅथलेटिक्स
-पुरुष थाली फेक – योगेश कथुनिया
-पुरुष भालाफेक – सुंदर सिंह गुर्जर, अजीत सिंह, देवेंद्र झाजरिया
-पुरुष भालाफेक – सुमित अंटिल, संदीप चौधरी

30 ऑगस्ट
नेमबाजी
– पुरुष 10 मीटर एयर रायफल – स्वरूप महावीर उन्हालकर, दीपक सैनी
– महिला 10 मीटर एयर रायफल – अवनी लेखारा

31 ऑगस्ट
नेमबाजी
– पुरुष १० मीटर एयर पिस्टल – मनीष नरवाल, दीपेंदर सिंह, सिंहराज
– महिला १० मीटर एयर पिस्टल – रुबिना फ्रांसिस

31 ऑगस्ट
अ‍ॅथलेटिक्स
-पुरुष उंच उडी- शरद कुमार, मारियप्पन थंगावेलू, वरूण भाटी
-महिला 100 मीटर – सिमरन
-महिला शॉटपुट – भाग्यश्री माधवराव जाधव

1 सप्टेंबर
बॅडमिंटन
– पुरुष एकेरी – प्रमोद भगत, मनोज सरकार
-महिला एकेरी- पलक कोहली
-मिश्र दुहेरी – प्रमोद भगत आणि पलक कोहली

1 सप्टेंबर
अ‍ॅथलेटिक्स
पुरुष क्लब थ्रो – धर्मबीर नैन, अमित कुमार सरोहा

2 सप्टेंबर
बॅडमिंटन
-पुरुष एकेरी – सुहास लालिनाकेरे यातिराज, तरुण ढिल्लन
-पुरुष एकेरी- कृष्णा नागर
-महिला एकेरी – पारुल परमार
-महिला मिश्र – पारुल परमार आणि पलक कोहली

2 सप्टेंबर
पॅरा कॅनॉइंग
महिला गट- प्राची यादव

2 सप्टेंबर
तायक्वांडो
-महिला गट – 49 किलो- अरुणा तंवर

2 सप्टेंबर
नेमबाजी
-मिक्स्ड – 25 मीटर पिस्टल – आकाश आणि राहूल जाखड

3 सप्टेंबर
नेमबाजी
-पुरुष – 50 मीटर रायफल – दीपक सैनी
-महिला – 50 मीटर रायफल – अवनी लेखारा

3 सप्टेंबर
स्विमिंग
-350 मीटर बटरफ्लाई- सुयश जाधव, निरंजन मुकुंदन

3 सप्टेंबर
अ‍ॅथलेटिक्स
-पुरुष उंच उडी – प्रवीण कुमार
-पुरुष भालाफेक – टेक चंद
-पुरुष शॉटपुट – सोमन राणा
-महिला क्लब थ्रो – एकता भ्यान, कशिश लाकडा

4 सप्टेंबर
नेमबाजी
– मिक्स्ड राउंड – 10 मीटर एयर रायफल – दीपक सैनी, सिद्धार्थ बाबू आणि अवनी लेखारा
– मिक्स्ड राउंड – 50 मीटर पिस्टल – आकाश, मनीष नरवाल आणि सिंहराज

4 सप्टेंबर
अ‍ॅथलेटिक्स
-पुरुष भालाफेक – नवदीप सिंह

5 सप्टेंबर
नेमबाजी
-मिक्स्ड राउंड – 50 मीटर रायफल-दीपक सैनी, अवनि लेखारा आणि सिद्धार्थ बाबू

पॅरालिम्पिक्स म्हणजे काय?

पॅरालिम्पिक्स ही देखील आंतरराष्ट्रीय अनेक खेळ खेळवण्यात येणारी क्रिडा स्पर्धा आहे. ज्यामध्ये ऑलिम्पिकप्रमाणेच खेळ असतात. ज्यात सांघिक खेळांसह वैयक्तीक स्पर्धा असतात. फक्त या ठिकाणी खेळणारे खेळाडू हे अपंगत्व असलेले असतात. ज्यात एखादा शरीराचा भाग नसणे, स्नायूंची कमतरता, पायाच्या लांबीत फरक, अत्यंत कमी उंची अशा अनेक प्रकारच्या शाररिक बाधा असणारे खेळाडू सहभाग घेतात. आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीद्वारे (IPC) या खेळांचे आयोजन केले जाते.

इतर बातम्या

Tokyo Paralympics: पंतप्रधान मोदींनी पॅरालिम्पिक्ससाठी रवाना होणाऱ्या खेळाडूंशी साधला संवाद, 24 ऑगस्टपासून स्पर्धेला सुरुवात

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शब्द पाळला, पीव्ही सिंधूला विजयानंतर दिलेलं Promise पूर्ण

टाटांच्या दिलदारपणाला हॅट्सऑफ, ऑलिम्पिकमध्ये पदक न मिळवणाऱ्या खेळाडूंनाही भारदस्त कार देणार

(Indias Tokyo Paralympics schedule in marathi)