ऑलिम्पिक पदक विजेत्या मनु भाकरचा मोठा खुलासा, पीव्ही सिंधुसाठी तयार केलं होतं फेक अकाउंट, का ते जाणून घ्या

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सध्या भारताकडून एकाच नावाची जोरदार चर्चा आहे. ते म्हणज मनु भाकर.. मनु भाकरने नेमबाजीत दोन कास्य पदकांची कमाई केली आहे. एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत अशी कामगिरी करणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. असं असताना मनु भाकरने पीव्ही सिंधुबाबत एक खुलासा केला आहे. तसेच फेक अकाउंटबाबत सांगितलं आहे.

ऑलिम्पिक पदक विजेत्या मनु भाकरचा मोठा खुलासा, पीव्ही सिंधुसाठी तयार केलं होतं फेक अकाउंट, का ते जाणून घ्या
| Updated on: Jul 31, 2024 | 7:59 PM

भारतीय ऑलिम्पिक इतिहासात मनु भाकरचं नाव सुवर्ण अक्षरात नोंदवलं गेलं आहे. मनु भाकर एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदकं जिंकणारी पहिली भारतीय ठरली आहे. 10 मीटर एअर पिस्टल वैयक्तिक आणि मिक्स्डमध्ये तिने ही कामगिरी केली आहे. तिच्या या कामगिरीमुळे संपूर्ण देशात तिच्या नावाचा उदो उदो होत आहे. सर्वच स्तरातून मनुवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, मनु भाकरने पीव्ही सिंधुशी निगडीत एक खुलासा केला आहे. त्यामुळे तिच्या कौतुकात आणखी भर पडली आहे. पिस्टल क्वीन मनु भाकरने पीव्ही सिंधुच्या ट्रोलर्संना गप्प करण्यासाठी सोशल मीडियावर फेक अकाउंट तयार केलं होतं. स्पोर्ट्स्टारला दिलेल्या मुलाखतीत मनु भाकर हीने याबाबतचा खुलासा केला आहे. ‘एकदा असं झालं की मी पीव्ही सिंधुच्या पाठीशी उभं राहण्यासाठी एक फेक अकाउंट तयार केलं होतं. मी काही वाईट कमेंट्स पाहिल्या आणि माझा संताप झाला होता. मग मी फेक अकाउंटच्या माध्यमातून त्या ट्रोलर्संना उत्तर दिलं होतं.’

पीव्ही सिंधुने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचण्याच्या प्रयत्नात आहे. सिंधुने रियो ऑलिम्पिकमध्ये रजत आणि टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कास्य पदकाची कमाई केली आहे. या ऑलिम्पिक स्पर्धेत पीव्ही सिंधु तिसरं पदक मिळवण्याच्या तयारीत आहे. जर असं झालं तर वैयक्तिक पातळीवर तीन पदक मिळवणारी भारतीय खेळाडू ठरेल. असं असताना तिने मनु भाकरसाठी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

पीव्ही सिंधुने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ‘किती प्रेमळ मुलगी आहे..दोन ऑलिम्पिक पदकांच्या क्लबमध्ये तुझं स्वागत आहे..मनु..खूप छान काम करत आहे. या तरुणीचा दोन ऑलिम्पिक पदकांच्या पंगतीत स्वागत करण्यासाठी यापेक्षा चांगला फोटोचा विचार करू शकत नाही. सोशल मीडियावर माझा बचाव करण्यासाठी आणि दोन मेडलच्या क्लबमध्ये सामील होण्यापर्यंतचा प्रवासात स्पष्ट दिसतं की तुझ्यात एक वेगळीच क्षमता आहे. मनु, तुझा टोक्यो 2020 पासून पुनरागमन करतानाचा प्रवास प्रेरणादायी आहे. देव तुझं रक्षण करेल.’