मोठी घोषणा! पाकिस्तान संघ भारतात खेळणार; चॅम्पियन्स ट्रॉफीचं वेळापत्रक जाहीर

एएचएफ पुरुष आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 च्या तारखांची अधिकृत घोषणा केली. ही प्रतिष्ठेची आंतरराष्ट्रीय स्पर्धा 27 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2026 या कालावधीत पंजाबमधील मोहाली आणि जालंधर येथे आयोजित केली जाणार आहे.

मोठी घोषणा! पाकिस्तान संघ भारतात खेळणार; चॅम्पियन्स ट्रॉफीचं वेळापत्रक जाहीर
मोठी घोषणा! पाकिस्तान संघ भारतात खेळणार; चॅम्पियन्स ट्रॉफीचं वेळापत्रक जाहीर
Image Credit source: PTI
| Updated on: Sep 14, 2026 | 6:26 PM

क्रीडा जगतातून एक अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे. यंदाची ‘मेन्स आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धा 2026’ भारतात आयोजित करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने 14 सप्टेंबर 2026 रोजी या बहुप्रतीक्षित स्पर्धेच्या तारखांची आणि अधिकृत वेळापत्रकाची घोषणा केली आहे. ही संपूर्ण स्पर्धा 27 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2026 दरम्यान पंजाबमधील दोन प्रमुख शहरांमध्ये खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत भारतासह कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा संघही भारत दौऱ्यावर येणार असल्यामुळे क्रीडा रसिकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. पण पाकिस्तानचा संघ भारतात येणार का? असा प्रश्न आहे. गेल्या वर्षी, म्हणजेच नोव्हेंबर-डिसेंबर 2025 मध्ये तामिळनाडू येथे झालेल्या ‘ज्युनियर पुरुष हॉकी वर्ल्ड कप’ स्पर्धेतून पाकिस्तानच्या संघाने माघार घेतली होती.

पंजाब सज्ज; मोहाली आणि जालंधरमध्ये सामने

हॉकीचा हा महाकुंभ पंजाबच्या ऐतिहासिक मैदानांवर रंगणार आहे. या स्पर्धेची ओपनिंग सेरेमनी आणि साखळी फेरीचे सर्व सामने जालंधरमध्ये खेळवले जाणार आहेत. तर स्पर्धेतील सर्वात महत्त्वाचे आणि हाय-व्हाल्टेज असलेले उपांत्य आणि अंतिम फेरीचे सामने मोहाली येथे आयोजित केले जातील. या स्पर्धेत आशिया खंडातील भारत, पाकिस्तान, चीन, जपान, कोरिया आणि मलेशिया हे 6 तगडे संघ विजेतेपदासाठी एकमेकांशी भिडणार आहेत.

हॉकी इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, पंजाबचे माननीय मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सोमवारी मोहाली येथे ‘एएचएफ पुरुष आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2026’ च्या तारखांची अधिकृत घोषणा केली. या विशेष प्रसंगी हॉकी इंडियाचे सरचिटणीस  भोला नाथ सिंग, महासंचालक कमांडर आर. के. श्रीवास्तव, कार्यकारी मंडळाचे सदस्य आर. पी. सिंग आणि हॉकी पंजाबचे अध्यक्ष  नितीन कोहली हे देखील उपस्थित होते.

दरम्यान, पाकिस्तान संघाच्या भारत दौऱ्याबाबत बोलताना पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी एक मोठे विधान केले आहे. ते म्हणाले, “अशा बहुराष्ट्रीय स्पर्धा भारतात खेळवण्यास काहीच हरकत नाही. सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात कदाचित द्विपक्षीय मालिका होणार नाही, परंतु आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीसारख्या आंतरराष्ट्रीय मंचावर दोन्ही संघ एकमेकांसमोर खेळताना दिसतील.”

आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या सुरक्षेच्या आणि नियोजनाच्या दृष्टीने आशियाई हॉकी महासंघाने ओमान आणि बांगलादेश या दोन संघांना ‘राखीव संघ’ म्हणून ठेवले आहे. जर ऐनवेळी एखाद्या संघाने स्पर्धेतून माघार घेतली, तर या दोन पैकी एका संघाला मुख्य स्पर्धेत खेळण्याची संधी दिली जाईल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us