
भारताची दिग्गज महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हीने निवृत्तीतून माघार घेतली आहे. 31 वर्षीय विनेश 2028 मध्ये होणाऱ्या लॉस एंजिल्स ऑलिम्पिक स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला आहे. विनेश फोगाटने निवृत्तीची घोषणा केली होती. पण आता तिने आपला निर्णय बदलला आहे. विनेश गेल्या काही वर्षात बऱ्याच कारणांमुळे चर्चेत राहिली आहे. 2024 पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवलं होतं. पण अंतिम फेरीच्या रात्री विनेश फोगाट ओव्हरवेट असल्याने तिला अपात्र घोषित करण्यात आलं. 50 किलो वजनी गटात तिचं वजन 100 ग्रॅम अधिक असल्याने अयोग्य घोषित केलं होतं. तिने याबाबत राग व्यक्त करत कट कारस्थान असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर रागाच्या भरात तिने कुस्तीतून निवृत्तीची घोषणा केली होती.
विनेश फोगाटने सोशल मीडियावर एक पोस्ट करून याबाबतची माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये तिने आता पुढचं लक्ष्य लॉस एंजिल्स येथे होणारी 2028 ऑलिम्पिक स्पर्धा असल्याचं सांगितलं आहे. विनेशने इंस्टाग्रामवर पोस्ट करत लिहिलं की, ‘लोक मला अनेकदा विचारतात की पॅरिस ही माझी शेवटची ट्रिप होती का? माझ्याकडे बराच काळ त्या प्रश्नाचे उत्तर नव्हते. मला मॅट, दबाव, अपेक्षा आणि अगदी माझ्या स्वप्नांपासून दूर जायचे होते. वर्षानुवर्षे पहिल्यांदाच मी सुटकेचा नि:श्वास सोडला. माझे काम, जीवनातील चढ-उतार, त्याग, जगाने कधीही न पाहिलेले माझे पैलू समजून घेण्यासाठी मला थोडा वेळ लागला. मला अजूनही खेळ आवडतो. मला अजूनही स्पर्धा करायची आहे.’
‘शांततेत मला काहीतरी विसरले होते ते सापडले. ‘आग कधीच विझत नाही.’ फक्त थकवा आणि आवाजाखाली दबले गेले होते. शिस्त, दिनचर्या, लढाई… ते माझ्या शरीरात रुजले आहे. मी कितीही दूर गेलो तरी, माझा एक भाग मॅटवर राहतो. म्हणून मी येथे आहे, निर्भय हृदयाने आणि झुकण्यास नकार देणाऱ्या आत्म्याने, LA28 च्या दिशेने परत पाऊल टाकत आहे. आणि यावेळी, मी एकटी चालत नाहीये; माझा मुलगा माझ्या संघात सामील होत आहे, माझी सर्वात मोठी प्रेरणा, 2028 च्या ऑलिंपिकच्या या मार्गावर माझा छोटासा चीअरलीडर.’, असंही विनेशने पुढे लिहिलं आहे.