विनेश फोगट
विनेश फोगाट एक कुस्तीपटू आहे. विनेश फोगटने अनेक कुस्ती स्पर्धांमध्ये पदके जिंकली आहेत. तिच्याकडे जागतिक अजिंक्यपद स्पर्धा, ऑलिम्पिक आशियाई क्रीडा स्पर्धा आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधून पदके आहेत. विनेशने महिला कुस्तीच्या 48 किलो, 52 किलो, 53 किलो आणि 50 किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. कुस्ती मॅटवरील विनेशचे सर्वात मोठे यश म्हणजे ऑलिंपिक फायनलमध्ये पोहोचणे. विनेशने पॅरिस ऑलिंपिकमध्ये ही कामगिरी केली. विनेश ही ऑलिंपिक अंतिम फेरीत भाग घेणारी पहिली भारतीय महिला कुस्तीगीर आहे. आंतरराष्ट्रीय मॅटवर महिलांच्या 50 किलो वजनी गटात चार वेळा विश्वविजेत्या युई सुसाकीला हरवणारी ती जगातील पहिली कुस्तीगीर आहे.
Vinesh Phogat : विनेश फोगाटचा यु टर्न, ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वीच घेतला मोठा निर्णय
भारताची महिला कुस्तीपूट विनेश फोगाट गेल्या काही वर्षात चर्चेत राहिली. राजकीय उलथापालथीत तिने राजकारणतही नशिब आजमावलं. इतकंच कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख बृज भूषण शरण सिंह यांच्याविरोधात शड्डू ठोकला होता. त्यानंतर तिने आंतरराष्ट्रीय कुस्तीला रामराम ठोकला. पण आता यु टर्न घेतला आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Dec 12, 2025
- 5:07 pm