AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC 2027 : न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 9 विकेट्सने केलं पराभूत, गुणतालिकेत भारताला बसला मोठा फटका

न्यूझीलंडने दुसर्‍या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजला 9 गडी राखून पराभूत केलं. या पराभवासह तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. तर वर्ल्ड टेस्ट गुणतालिकेत मोठा उलटफेर पाहायला मिळत आहे. चला जाणून घेऊयात काय झालं ते...

WTC 2027 : न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 9 विकेट्सने केलं पराभूत, गुणतालिकेत भारताला बसला मोठा फटका
Image Credit source: New Zealand cricket/BCCI Twitter
| Updated on: Dec 12, 2025 | 4:20 PM
Share

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 स्पर्धेत न्यूझीलंड विरूद्ध वेस्ट इंडिज यांच्यात मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या सामना ड्रॉ झाला, तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 9 विकेटने पराभवाची धूळ चारली. या सामन्यात नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. कर्णधार टॉम लॅथमने घेतलेला हा निर्णय योग्यच ठरला. पहिल्या डावात न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 205 धावांवर गुंडाळलं. तसेच या धावांचा पाठलाग करताना 278 धावा केल्या आणि 9 विकेट गमावल्यानंतर डाव घोषित केला. यासह पहिल्या डावात न्यूझीलंडने 73 धावांची आघाडी घेतली. वेस्ट इंडिजने दुसर्‍या डावात 128 धावा केल्या. त्यामुळे 73 वजा करता 55 धावांचं आव्हान न्यूझीलंडसमोर ठेवलं. न्यूझीलंडने 1 गडी गमवून हे आव्हान पूर्ण केलं.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत उलटफेर

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडच्या विजयानंतर मोठा उलटफेर पाहायला मिळत. यामुळे टीम इंडिया आणि पाकिस्तानला फटका बसला आहे. कारण न्यूझीलंड आणि श्रीलंका 66.67 विजयी टक्केवारीसह संयुक्तरित्या तिसऱ्या स्थानावर आहे. तर पाकिस्तान 50 टक्क्यांसह पाचव्या स्थानावर घसरला आहे. तर भारताची 48.15 विजयी टक्केवारीसह सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे. त्यामुळे भारताला आता टॉप 2 मध्ये स्थान मिळवणं खूपच कठीण जाणार आहे. कारण विजयी टक्केवारी वाढण्याची मोठी संधी दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत होती. मात्र दोन्ही सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आणि विजयी टक्केवारी घसरली.

ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 5 कसोटी सामने खेळले असून पाचही जिंकले असून 100 टक्के विजयी टक्केवारी आहे. यासह पहिल्या स्थानी कायम आहेत. दक्षिण अफ्रिकेने 4 पैकी तीन सामन्यात विजय आणि एका सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं आहे. त्यामुळे 75 टक्क्यांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

इंग्लंडने आतापर्यंत 7 कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी 2 सामन्यात विजय आणि 4 सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं आहे. 30.95 विजयी टक्केवारीसह सातव्या स्थानावर आहे. बांग्लादेश दोन सामने खेळली असून एका सामन्यात पराभव आणि एक ड्रॉ झाला. त्यामुळे विजयी टक्केवारी 16.67 आहे. तर वेस्ट इंडिजने 7 पैकी 6 सामने गमावल्याने विजयी टक्केवारी 4.76 आहे.

वडेट्टीवार दुसऱ्या दिवशी सभागृहात भडकले, शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्य
वडेट्टीवार दुसऱ्या दिवशी सभागृहात भडकले, शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्य.
आम्ही श्रीमंतांचे शेठ नसून गोरगरिबांचे शेठ... भरत गोगावलेंचा हल्लाबोल
आम्ही श्रीमंतांचे शेठ नसून गोरगरिबांचे शेठ... भरत गोगावलेंचा हल्लाबोल.
जरांगेंचे सरकारवर गंभीर आरोप अन् कुणबी प्रमाणपत्रासंदर्भात मागणी काय?
जरांगेंचे सरकारवर गंभीर आरोप अन् कुणबी प्रमाणपत्रासंदर्भात मागणी काय?.
हिवाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस, नागपुरात धडकले दोन मोर्चे, मागण्या काय?
हिवाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस, नागपुरात धडकले दोन मोर्चे, मागण्या काय?.
नवाब मलिक प्रकरणामुळे महायुती चर्चेत अडथळा, भाजपचा विरोध स्पष्ट
नवाब मलिक प्रकरणामुळे महायुती चर्चेत अडथळा, भाजपचा विरोध स्पष्ट.
हिवाळी अधिवेशन सुरूये की फॅशन शो... अंजली दमानिया यांचा संताप
हिवाळी अधिवेशन सुरूये की फॅशन शो... अंजली दमानिया यांचा संताप.
साहेबांनी आमचे खूप लाड केले, पंकजा मुंडेंकडून वडिलांच्या आठवणीना उजाळा
साहेबांनी आमचे खूप लाड केले, पंकजा मुंडेंकडून वडिलांच्या आठवणीना उजाळा.
एकनाथ शिंदेंचा थेट शरद पवार यांना फोन अन् दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
एकनाथ शिंदेंचा थेट शरद पवार यांना फोन अन् दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.
तोडगा निघाला... सर्व महापालिका मुहायुती एकत्र लढणार, बैठकीत काय ठरलं?
तोडगा निघाला... सर्व महापालिका मुहायुती एकत्र लढणार, बैठकीत काय ठरलं?.
आरशात पाहावं...उद्धव ठाकरेंच्या टीकेला भाजपच्या बड्या नेत्याचं उत्तर
आरशात पाहावं...उद्धव ठाकरेंच्या टीकेला भाजपच्या बड्या नेत्याचं उत्तर.