डोपिंग चाचणी म्हणजे नेमकं काय? त्याचे शरीरावर होणारे दुष्परिणाम, जाणून घ्या सर्वकाही

What is a Doping Test : डोपिंगचे जाळे आता जगभर पसरले आहे. डोपिंग म्हणजे प्रत्येक खेळाला एक प्रकारची कीडच लागत चालली आहे. आताचा पार पडलेल्या पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्येही काही खेळाडू डोप चाचणीमध्ये सापडले. बीजिंग ऑलिम्पिक 2008 मध्ये तब्बल 23 पदक विजेते खेळाडू डोप चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आले होते.  डोपिंग चाचणी घेतली जाते याची माहिती असतानाही खेळाडू का घेत असतील? खेळाडूंच्या सावलीसारखे सोबत असलेले त्यांचे कोचेस त्यांना रोखत नाहीत का? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर खेळाडू आणि कोचेस शॉर्टकट वापरतात. मात्र हा शॉर्टकट शरीरासाठी किती हानिकाकर ठरू शकतो याची कल्पनाही तुम्ही करू शकत नाही. या लेखात डोपिंग चाचणी म्हणजे काय? डोपिंग चाचणी कशी केली जाते, त्याचे परिणाम काय याबाबत संपूर्ण माहिती जाणून घ्या.

डोपिंग चाचणी म्हणजे नेमकं काय? त्याचे शरीरावर होणारे दुष्परिणाम, जाणून घ्या सर्वकाही
| Updated on: Sep 04, 2024 | 2:07 PM

आता डोपिंगच्या जाळ्यात लहानांपासून दिग्गज खेळाडू अडकले आहेत. कोणताही खेळ घ्या, आपल रांगडा तांबड्या मातीतील कुस्तीमध्येही हे विष पसरलं आहे. कुस्ती खेळण्याआधी सोडाच पण सिक्स पॅकवाल्या बॉडीसाठी तरूण मुलं स्वत: इंजेक्शन मारून घेऊ लागली आहेत. हा विषय झाला कुस्तीचा पण सर्वच खेळांमध्ये आता डोपिंग होत असल्याचं पाहायला मिळत आहे. पोलीस भरती, आर्मी भरती अशा अनेक भरत्यांमध्ये उमेदवार धावण्याआधी डोपिंग करत आहेत. या डोपिंग चाचणीबाबतची माहिती समजून घ्या. डोपिंग चाचणी म्हणजे काय? सर्व क्रीडा स्पर्धांमध्ये डोप चाचणी घेतली जाते. ही चाचणी करण्यासाठी, लघवी आणि रक्ताचे नमुने घेतले जातात. या चाचणीचा उद्देश एखाद्या खेळाडूने कोणतेही औषध, ताकद वाढवणारी टॅब्लेट किंवा इतर मादक पदार्थाचे सेवन केले आहे का? अशा पदार्थांचा वापर करून त्याने खेळामध्ये चांगली कामगिरी केली का हे पाहिलं जातं. क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होताना खेळाडूने कोणत्याही मादक द्रव्ये किंवा उत्तजेक पदार्थाचे सेवन केले आहे...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा