Wimbledon 2021, Women’s Singles Final : विम्बल्डनची नवी राणी, क्रिकेटपटू अश्र्ले बार्टीचा इतिहास, प्लिस्कोवाला नमवत विजेतेपदावर नाव कोरलं

| Updated on: Jul 11, 2021 | 6:57 AM

ऑस्ट्रेलियाच्या 25 वर्षीय अश्र्ले बार्टीने (Ashleigh Barty) झेक प्रजासत्ताकच्या 29 वर्षीय प्लिस्कोवाला नमवून विम्बल्डनच्या विजेतेपदावर नाव कोरलं. (Wimbledon 2021, Women’s Singles Final Ashleigh barty Wins 2nd Grandslam)

Wimbledon 2021, Women’s Singles Final :  विम्बल्डनची नवी राणी, क्रिकेटपटू अश्र्ले बार्टीचा इतिहास, प्लिस्कोवाला नमवत विजेतेपदावर नाव कोरलं
Ashleigh Barty
Follow us on

Wimbledon 2021 : टेनिस जगतातील मानाच्या विम्बल्डन स्पर्धेत महिला गटात कोण विजेती होणार याकडे सगळ्या जगाचे लक्ष लागलं होतं अखेर या प्रश्नाचे उत्तर मिळालंय. ऑस्ट्रेलियाच्या 25 वर्षीय अश्र्ले बार्टीने (Ashleigh Barty) झेक प्रजासत्ताकच्या 29 वर्षीय प्लिस्कोवाला नमवून विम्बल्डनच्या विजेतेपदावर नाव कोरलं. दोन्ही महिला टेनिसपटू पहिल्यांदाच विम्बल्डन टेनिस ग्रँडस्लॅमच्या महिला एकेरीच्या अंतिम लढतीत पोहोचल्या होत्या. अपेक्षेप्रमाणे लढत अत्यंत रोमहर्षक झाली. (Wimbledon 2021, Women’s Singles Final Ashleigh Barty Wins 2nd Grandslam)

अशी झाली मॅच…

अंतिम सामन्यात झेक प्रजासत्ताकच्या तेराव्या मानांकन प्राप्त कॅरोलीना प्लिस्कोवाला अश्र्ले 6-3, 6-7, 6-3 अशा फरकाने नमून विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. अश्र्ले बार्टीचं हे पहिलंच विम्बल्डनचं विजेतेपद आहे.

पहिल्या सेटमध्ये दमदार खेळ करणाऱ्या बार्टीला दुसऱ्या सेटमध्ये ती काहीशी बॅकफूटला गेली होती. प्लिस्कोवाने दुसऱ्या सेटमध्ये जोरदार खेळ करत पार्टीला जोरदार लढत दिली. मात्र तिसऱ्यामध्ये बार्टीने आपलं सर्वस्व पणाला लावून प्लिस्कोवाला नमवलं.

हा सामना एक तास पंचावन्न मिनिटे रंगला. सप्टेंबर 2019 पासून बार्टी अव्वल क्रमांकावर आहे तर बार्टीचा एकेरीमधील हा 281 वा विजय आहे. एकूण कारकिर्दीमधील हे 12 वं विजेतेपद आहे.

विजयानंतर बार्टी काय म्हणाली…?

मी बालपणी पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं. स्पर्धेच्या एक दिवस आधी मला झोप लागली नाही. आपण हरलो तर काय होईल? या विचाराने मी अख्खी रात्र जागून काढली. मला मिळालेला विजय हा अविश्वसनीय आहे, अशी प्रतिक्रिया विजयानंतर बार्टीने दिली. विम्बल्डन स्पर्धेला 141 वर्षांचा जुना इतिहास आहे.

क्रिकेटपटू बार्टी…!

बार्टीने 2015-16 मध्ये क्रिकेटच्या मैदानातही नशीब आजमावलं. ऑस्ट्रेलियाच्या t20 बिग बॅश लीगमध्येही ती खेळली. ब्रिस्बेन संघाकडून खेळताना तिनं क्रिकेटचेही गुण दाखवले. मात्र तिला क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करण्यात अपयश आलं. ब्रिस्बेन संघाकडून खेळताना 39 ही तिची सर्वाधिक धावसंख्या आहे.

41 वर्षांचा दुष्काळ संपुष्टात!

ऑस्ट्रेलियाकडून विम्बल्डन स्पर्धा जिंकणारी गेल्या 41 वर्षांतली बार्टी ही पहिलीच महिला खेळाडू आहे. याअगोदर 1980 ला इवॉन गूलागाँगने विम्बल्डन स्पर्धा जिंकली होती. तिने दोन विजेतेपदावर नाव कोरलं होतं. तिच्यानंतर कोणत्याही ऑस्ट्रेलियन महिला खेळाडूला अशी कामगिरी करता आली नव्हती. आता 41 वर्षानंतर बार्टीने विम्बल्डन जिंकून ऑस्ट्रेलियाच्या विम्बल्डन चॅम्पियनचा दुष्काळ संपवला आहे.

(Wimbledon 2021, Women’s Singles Final Ashleigh barty Wins 2nd Grandslam)

हे ही वाचा :

Wimbledon 2021, Women’s Singles Final : अ‍ॅश्ले बार्टी आणि कॅरोलीना प्लिसकोवामध्ये अंतिम लढत, सामना कधी, कुठे आणि कसा पाहणार?