T20 World Cup: पाकिस्तानी चाहत्याने शोएब अख्तरसमोर केली शाहरुख खानची सेम टू सेम नक्कल, पाहा व्हिडिओ

काल शोएब अख्तर गाडीतून निघालेला असताना, त्याने चाहत्यांशी अख्तरने गप्पा मारल्या.

T20 World Cup: पाकिस्तानी चाहत्याने शोएब अख्तरसमोर केली शाहरुख खानची सेम टू सेम नक्कल, पाहा व्हिडिओ
Shoaib-Akthar
Image Credit source: instagram
| Updated on: Nov 08, 2022 | 1:19 PM

नवी दिल्ली : विश्वचषक स्पर्धेचा (T20 World Cup) उद्यापासून सेमीफायनलचा राऊंड सुरु होत आहे. उद्या पाकिस्तान (Pakistan) आणि न्यूझिलंड (NZ) यांच्यात सिडनीच्या(Sydney) मैदानात महामुकाबला होणार आहे. दोन्ही टीम सिडनीत दाखल झाल्या असून कसून सराव करीत आहेत. पाकिस्तान टीम सेमीफायनलमध्ये पोहोचल्यापासून पाकिस्तानचे दिग्गज खेळाडू पाकिस्तानच्या टीमला सल्ला देत आहेत.

काल शोएब अख्तर गाडीतून निघालेला होता, त्यावेळी त्याने चाहत्यांशी गप्पा मारल्या. ज्यावेळी शोएब अख्तर चाहत्यांशी गप्पा मारीत होता. त्यावेळी त्याने एक व्हिडीओ मोबाईलमध्ये कैद केला आहे. सेमीफायनलमधील मॅच विषयी चाहत्यांशी तो गप्पा मारीत आहे. गप्पा मारण्यासाठी गाडीच्या काचेजवळ अनेकजण आले होते.

त्या चाहत्यांपैकी एका चाहत्याने बॉलिबूडचा बादशहा शाहरूख खानचा सेम टू सेम आवाज काढला आहे. व्हिडीओ पाहत असताना काहीवेळ खरा शाहरुख खान बोलत असल्याचा भास होत आहे. त्यामुळे शोएब अख्तरचा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे.