AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Modi Meets Team India : पीएम मोदी महिला संघाला भेटले, पण ICC वर्ल्ड कप ट्रॉफीला का स्पर्श केला नाही?

PM Modi Meets Team India : भारतीय महिला क्रिकेट टीम 5 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी त्यांच्या 7 लोक कल्याण मार्गावरील निवासस्थानी गेली होती. यावेळी पीएम मोदींनी खेळाडूंसोबत फोटो काढले. पण खास बाब ही आहे की, त्यांनी ट्रॉफीला स्पर्श केला नाही.

PM Modi Meets Team India : पीएम मोदी महिला संघाला भेटले, पण ICC वर्ल्ड कप ट्रॉफीला का स्पर्श केला नाही?
PM Modi Meets Team IndiaImage Credit source: PTI
| Updated on: Nov 06, 2025 | 9:11 AM
Share

भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिल्यांदा आयसीसी महिला वर्ल्ड कप 2025 जिंकला आहे. चॅम्पियन बनून इतिहास रचला आहे. त्यामुळे संपूर्ण देशात आनंदाच वातावरण आहे. या शानदार विजयानंतर महिला टीम 5 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी त्यांच्या 7 लोक कल्याण मार्गावरील निवासस्थानी पोहोचली. या दरम्यान खेळाडूंनी पीएम सोबत फोटो काढले. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होत आहेत. एका खास फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी कॅप्टन हरमनप्रीत कौर आणि उपकर्णधार स्मृती मंधाना यांच्यामध्ये उभे दिसतायत. पण हैराण करणारी बाब म्हणजे पीएम मोदींनी वर्ल्ड कपच्या ट्रॉफीला स्पर्श केला नाही. यामागे एक खास कारण आहे.

वर्ल्ड कपच्या ट्रॉफीला फक्त चॅम्पियन्सच स्पर्श करतात, अशी मान्यता आहे. ही परंपरा खेळाडूंनी कमावलेल्या यशाच्या सन्मानासाठी आहे. पीएम मोदी यांनी यांचं पंरपरेच पालन करत वर्ल्ड कपच्या ट्रॉफीला स्पर्श करणं टाळलं. याचं सर्व श्रेय महिला टीमला दिलं. वर्ल्ड कपच्या ट्रॉफीला स्पर्श करण्याचा अधिकार देशाच्या पंतप्रधानांना आहे. पण पीएम मोदींनी खेळाडूंना सन्मान देण्यासाठी ट्रॉफीला स्पर्श करायचं टाळलं. या भेटी दरम्यान पीएम मोदींनी खेळाडूंकडून त्यांच्या विजयाची गोष्ट ऐकली. त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

पीएम मोदींनी पहिल्यांदा असं केलं नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असं करण्याची ही पहिली वेळ नाहीय. वर्ष 2024 मध्ये टी 20 वर्ल्ड कप जिंकून भारतीय टीम वेस्ट इंडिजहून थेट दिल्लीत उतरली होती. त्यांनी सुद्धा पीएम मोदींची भेट घेतलेली. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅप्टन रोहित शर्मा आणि कोच राहुल द्रविड यांच्यासोबत फोटो काढलेला. पण पीएम मोदींनी T20 वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नव्हता. पीएम मोदी यांच्या या निर्णयाचं त्यावेळी सुद्धा भरपूर कौतुक झालेलं.

ऑस्ट्रेलियाचा वनडे वर्ल्ड कपमधील हा पहिला पराभव

आयसीसी महिला वर्ल्ड कप जिंकणं हे भारतासाठी कुठल्या स्वप्नापेक्षा कमी नाही. आतापर्यंत एकदाही भारतीय महिला टीमला हा किताब जिंकता आलेला नव्हता. दोनवेळा फायनलमध्ये पोहोचून ट्रॉफीने हुलकावणी दिलेली. पण हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय टीमने अनेक वर्षांपासूनची ही प्रतिक्षा संपवली. सेमीफायनलमध्ये भारतीय टीमने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला धूळ चारली. 2017 नंतर ऑस्ट्रेलियन महिला टीमचा वनडे वर्ल्ड कपमधील हा पहिला पराभव आहे.

Follow Us
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....
Shivsena : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....; त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी