Priya Bapat: मी दोन-तीन दिवस…प्रिया बापटचा व्हायरल झालेला लेस्बियन इंटिमेट सीन, अभिनेत्रीच्या वडिलांची अशी होती प्रतिक्रिया, सांगितला प्रसंग

Priya Bapat Father Reaction On Her Lesbian Intimate Scene: मराठी अभिनेत्री प्रिया बापटने तिच्या वेब सीरिजमध्ये एक लेस्बियन इंटिमेट सीन दिला होता, त्यावर तिच्या वडिलांची प्रतिक्रिया कशी होती हे तिने बोलून दाखवले होते.

Priya Bapat: मी दोन-तीन दिवस...प्रिया बापटचा व्हायरल झालेला लेस्बियन इंटिमेट सीन, अभिनेत्रीच्या वडिलांची अशी होती प्रतिक्रिया, सांगितला प्रसंग
| Updated on: Nov 04, 2026 | 3:41 PM

Priya Bapat On Lesbian Scene : प्रिया बापटने मराठी सिनेविश्वात आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात ठसा उमटवला आहे. तिने मराठीत अनेक गाजलेली नाटकं, सिनेमा आणि वेब सीरिजमध्ये काम केले आहे. तिला विशेष ओळख मिळाली ती काकास्पर्थ या चित्रपटातील तिच्या भूमिकेमुळे. तिने हिंदीमध्येही काम केले आहे.  तिची सिटी ऑफ ड्रीमम्स ही वेब सीरिज खूप चर्चेत आली होती. या वेब सीरिजमध्ये प्रियाने लेस्बियन किसिंग सीन दिलेला ज्याची जोरदार चर्चा झाली होती.  तिच्या त्या सीनवर प्रियानेही प्रतिक्रिया दिली होती.

डिजिटल कॉमेंट्री क्लिप्स ला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रिया म्हणालेली की, ” एजाज खान आणि मी प्रमोशनसाठी गेलो होतो. ‘सिटी ऑफ ड्रीम्स चा पहिला सीझन होता.  अचानक माझा फोन वाजला. मला सगळ्यांनी सांगितलं की तू ओपन करु नकोस व्हिडिओ. मला ते एक क्लिप म्हणून बघायचेच नव्हतं, कारण मी काय केले आहे हे मला माहित होतेच ना, पण आम्हाला कळत नव्हतं हे बाहेर आलं तरी कसं? कारण रात्री १२ ला एपिसोड टेलिकास्ट झाला होता, आम्ही सकाळी प्रमोशन करायला सुरुवात केली, तेव्हा हा व्हिडिओ व्हायरल झाला.  आणि हा प्रमोशन स्ट्रॅटेजी अजिबात नव्हती. 

Loading...

वडिलांच्या प्रतिक्रियेबद्दल प्रिया म्हणाली की, “मी घरी गेले, तेव्हा मला खूप त्रास झाला होता, पण ऑडिशनच्या सुरुवातीलाच त्यांनी मला हा सीन आणि हे कॅरेक्टर समजावून सांगितले होते. मी आयुष्यात पहिल्यांदाच असा इंटिमेट सीन देण्याचे धाडस केले होते.  मला नागेश सरांनी सगळं समजावून सांगितले होते, त्यानंतर मी माझ्या घरच्यांना फोन केला आणि त्यांना सांगितले की माझ्या वेब सीरिजमधून एक सीन व्हायरल होत आहे. तो लेस्बियन सीन आहे. पण त्याचा मला खूप त्रास झाला, मी दोन ते तीन दिवस रडतच होते. मी माझ्या वडिलांना फोन केला आणि त्यांनाही विचारलं, तुमच्या मुलीने जे केलंय ते चुकीचे तर नाहीये ना? त्यावर माझे बाबा स्पष्टच म्हणाले, ” हा तुझ्या कामाचा भाग आहे, तू केल आहे आणि आता सोडून दे हे.’

‘आणि मला एक समजत नाही, हे ट्रॉलर्स कोण आहेत प्रत्येकाच्या सेक्युअल लाईफबद्दल बोलणारे? आणि नेहमीच बायकांनाच का टार्गेट केलं जातं?’ असं प्रियाने पुढे म्हटलं होतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us