लिंग बदलानंतर संजय बांगरची लेक टीम इंडियाकडून खेळणार? अनायाच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये…

दिग्गज क्रिकेटर संजय बांगर यांचा मुलगा आर्यन बांगर याने मागच्या वर्षी जेंडर चेंज केले. ज्यानंतर विविध चर्चांना उधाण आले जेंडर चेंज केल्यानंतर आर्यन बांगरऐवजी अनाया बांगर असे नाव देखील बदलण्यात आले. अनाया बांगर सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे.

लिंग बदलानंतर संजय बांगरची लेक टीम इंडियाकडून खेळणार? अनायाच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये...
Anaya Bangar
| Updated on: Jul 30, 2025 | 1:56 PM

भारताचे दिग्गज क्रिकेटर संजय बांगर यांचा मुलगा आर्यन बांगर याने मागच्या वर्षी ‘जेंडर चेंज’ केले. आता तो आर्यन बांगरचा अनाया बांगर झाला. विशेष म्हणजे आता अनाया बांगर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. काही दिवसांपूर्वीच अनाया बांगर हिने चक्क लिंग बदल केल्यानंतर आपल्यासोबत काय घडत होते आणि कशाप्रकारचे मेसेज आपल्याला येत होते हे थेट सांगितले. जेंडर चेंज करण्याच्या अगोदर अनाया क्रिकेटर होती. विशेष म्हणजे क्लब क्रिकेटचा मोठा अनुभव देखील आहे. 

आता सर्वांनाचा प्रश्न पडलाय की, आर्यनवरून अनाया झाल्यानंतर संजय बांगर यांची लेक क्रिकेट खेळणार का? कारण अनाया बांगर हिने आपल्या इंस्टाग्राम बायोमध्ये क्रिेकेटर आणि मॉडेल असल्याचा उल्लेख केला आहे. अनाया बांगरला क्रिकेट खेळायचे आहे. पण ती भारतीय क्रिकेटर संघाचे प्रतिनिधित्व करू शकते का? हे आपण जाणून घेणार आहोत आणि नियम काय सांगतात.

2024 च्या महिला T 20 विश्वचषक पात्रता स्पर्धेत डॅनियल मॅकगीचे नाव खूप चर्चेत होते. मॅकगीची विश्वचषकासाठी कॅनेडियन संघात निवड झाली. देशाच्या महिला क्रिकेट संघात स्थान मिळवणारी ती जगातील पहिली ट्रान्स महिला खेळाडू ठरली. तिने काही सामने देखील खेळली. मात्र, त्यानंतर ICC ला आपल्या नियमात काही बदल करावी लागली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अर्थात ICC ने नोव्हेंबर 2023  मध्ये आपले धोरण बदलले. नवीन धोरणानुसार, कोणत्याही प्रकारच्या पुरुष खेळाडूला लिंग बदल केल्यानंतर महिला क्रिकेट सामन्यांमध्ये खेळण्याची परवानगी अजिबात मिळणार नाही. कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया असो किंवा उपचार घेतलेले. नवीन धोरणानुसार, आता अनाया बांगर हिला भारतीय क्रिकेट टीममध्ये क्रिकेट खेळता येणार नाही. तिला तशी परवानगीच मिळणार नाही. अनाया बांगर कधीच भारताचे प्रतिनिधित्व करू शकणार नाही.