Rohit Sharma Century : चेहऱ्यावर हसू पण डोळ्यांत अश्रूंची दाटी.. रोहितने शतक ठोकताच रितीकाची रिॲक्शन व्हायरल

rohit sharma hundred ritika sajdeh reaction : लॉर्ड्सवर शतक फटकावणार रोहित शर्मा हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याने 138 धावांची शानदार खएळी केली. त्याचे शतक पूर्ण होताच पत्नी रितीका सजदेहवर कॅमेऱ्याचा फोकस गेला आणि समोरचं दृश्य पाहून सगळेच हेलावले. सोशल मीडियावर रितीकाची रिॲक्शन व्हायरल झाली आहे.

Rohit Sharma Century :  चेहऱ्यावर हसू पण डोळ्यांत अश्रूंची दाटी.. रोहितने शतक ठोकताच रितीकाची रिॲक्शन व्हायरल
लॉर्ड्सवर रोहितने शतक ठोकताच पत्नी रितीका झाली भावूक
| Updated on: Jul 20, 2026 | 10:16 AM

लॉर्ड्सवर रोहित शर्मा शेवटचा सामना खेळणारे, आता त्याला 2027 त्या वर्ल्डकपच्या संघात स्थान नसणार, आता तो वनडेमध्ये खेळणार नाही… अशा विविध चर्चा, अटकळी, अफवांना उधाण आलेलं असतानाच, रोहित शर्माने (Rohit Sharma) त्यावर काहीच न बोलता, शांत राहून त्याच्या बॅटनेच सर्वांना चोख उत्तर दिलं. रविवारी लॉर्ड्सवर इंग्लडविरुद्धच्या सामन्यात हिटमॅनने शानदार शतक ठोठावलं, 138 धावांची सर्वोत्तम खेळी तर केलीच. पण या मैदानावर शतक फटकावणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याच्या या रेकॉर्डने सर्व चाहते तर आनंदी आहेतच पण इमोशनलही झालेले दिसले. चौकार फटकावून रोहितन ज्या क्षणी त्याचं शकत पूर्ण केलं, संपूर्ण मैदान टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेलं. ड्रेसिंग रूममध्ये कोच गौतम गंभीर पासून ते प्रत्येक खेळाडू उभा राहून रोहितचं कौतक करत होता. पण त्याच वळी कॅमेऱ्याचा फोकस स्टेडिअममध्ये बसलेल्या रोहितच्या पत्नीवर, रितीका सजदेहवरही गेला आणि तिथलं दृश्य पाहून सगळेच हेलावले. कारण आपल्या पतीच्या शानदार खेळीचं कौतुक करताना रितीचा टाळ्या तर वाजवत होती, तिच्या चेहऱ्यावर हास्यही होतं पण त्याच वेळी तिच्या डोळ्यातील अश्रू दिसताच ती किती इमोशनल झालीये तेही साफ दिसून आलं. सोशल मीडियावरही रितीकाची ही रिॲक्शन प्रचंड व्हायरल झाली असून तो व्हिडीओ प्रचंड चर्चेत आहे.

एका डोळ्यात हसू, एका डोळ्यात आसू…

इंगल्डने दिलेल्या विशाल आव्हानाच पाठलाग करताना भारताला पराभव पत्कारावा लागला खरा, पण रोहितच्या शतकाने अनेकांचं मन सुखावलं. डावाच्या 31व्या षटकातील चौथ्या चेंडूवर आदिल रशीदला चौकार ठोकत रोहितने त्याच्या वनडे कारकिर्दीतील 34वे शतक पूर्ण केलं. या क्षणी लॉर्ड्समधील प्रत्येक प्रेक्षक उभा राहून टाळ्यांचा वर्षाव करत होता. कॅमेरा रितिका सजदेहकडे वळताच तिच्या चेहऱ्यावरचा अभिमान आणि आनंद स्पष्ट दिसून आला. ती हसत असली तरी तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटून आले होते. डोळे पुसतानाचा तिचा व्हिडिओ काही क्षणांतच सोशल मीडियावर व्हायरल झाला.

 

138 धावांची रोहितची शानदार खेळी

यावेळी हिटमॅन रोहित शर्माने 110 चेंडूत 138 धावांची शानदार खेळी साकारली. त्यामध्ये 17 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. या खेळीदरम्यान रोहितने अनेक महत्त्वाचे विक्रम आपल्या नावावर केले. लॉर्ड्सवर वनडेमध्ये शतक झळकावणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. तसेच या ऐतिहासिक मैदानावर सर्वात वेगवान शतक करणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही त्याने तिसरे स्थान पटकावले. त्याने अवघ्या 84 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले.

सचिनचा विक्रम मागे टाकला

39 वर्षे आणि 80 दिवसांच्या वयात शतक झळकावत रोहित शर्मा वनडे क्रिकेटमध्ये शतक करणारा सर्वात वयस्कर भारतीय फलंदाज ठरला. यासोबतच कसोटी, वनडे आणि टी-20 या तिन्ही आंतरराष्ट्रीय प्रकारांमध्ये सर्वाधिक वयात शतक करणाऱ्या भारतीय फलंदाजाचा मानही त्याने पटकावला. याआधी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. सचिनने 38 वर्षे आणि 327 दिवसांच्या वयात वनडेमध्ये शतक झळकावले होते.

इंग्लंडमध्ये आठवे वनडे शतक

इंग्लंडच्या भूमीवर रोहितने झळकावलेले हे आठवे वनडे शतक ठरले. या कामगिरीसह त्याने इंग्लंडचा माजी सलामीवीर मार्कस ट्रेस्कोथिक यांच्या विक्रमाशी बरोबरी साधली. इंग्लंडमध्ये सर्वाधिक 10 वनडे शतकांचा विक्रम जो रूटच्या नावावर आहे. रोहितने या शतकासह एका परदेशी देशात सात किंवा त्याहून अधिक वनडे शतके झळकावणाऱ्या अनेक दिग्गज फलंदाजांनाही मागे टाकत आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला.

Follow Us