
भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू आणि उपकर्णधार स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचे लग्न 23 नोव्हेंबर रोजी सांगलीत होणार होते. या लग्नाची जय्यत तयारी करण्यात आली होती. संगीत आणि मेहंदीचा कार्यक्रमही धुमधडाक्यात झाला. या लग्नसोहळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडीओ पुढे आली. विशेष म्हणजे पलाश आणि स्मृती मानधना गेल्या सहा वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. पलाशने अत्यंत खास पद्धतीने स्मृती मानधना हिला स्टेडियममध्ये लग्नासाठी प्रपोझ केला. मात्र, ऐन लग्नाला काही तास शिल्लक असताना स्मृतीच्या वडिलांची अचानक तब्येत बिघडली आणि त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. स्मृती मानधना हिच्या वडिलांनी तब्येत बिघडल्यानंतर त्यांचे लग्न पुढे ढकलण्यात आले. मात्र, वडिलांची तब्येत बिघडल्यामुळे नाही तर स्मृती मानधना हिच्यासमोर पलाशचा खरा चेहरा आल्याने हे लग्न पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले जाते.
स्मृती मानधना आणि पलाश यांचे लग्न पुढे ढकलल्यानंतर पलाश याचे काही स्क्रीनशॉर्ट व्हायरल झाली. या स्क्रीनशॉर्टवरून स्पष्ट झाले की, पलाश हा स्मृती मानधनाला धोका देत होता. यामुळेच पलाशसोबत लग्न न करण्याचा निर्णय स्मृती मानधना हिने घेतल्याचा दावा केला जातो. हेच नाही तर पलाश याच्यावरही रूग्णालयात उपचार सुरू होते. स्मृती मानधना हिने तिच्या लग्नाबद्दल विविध चर्चा सुरू असताना त्यावर अजिबातच भाष्य केले नाही.
स्मृती मानधना हिने लग्नाबद्दल काहीच भाष्य केले नाही. मात्र, तिने पलाश मुच्छल याच्यासोबतचे लग्नातील कार्यक्रमातील सर्व व्हिडीओ आणि फोटो डिलीट केली. स्मृती मानधना हिने व्हिडीओ डिलीट केल्याने तूफान चर्चा रंगली. आता पलाश याने देखील स्मृती मानधना हिला स्टेडियममध्ये प्रपोज केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावरून डिलीट केल्याचे सांगितले जाते. स्मृती मानधनाला प्रपोज करतानाचा व्हिडीओ पलाश याने इंस्टाग्रामवर शेअर केला होता.
आता तोच व्हिडीओ त्याने सोशल मीडियावरून हटवल्याचे सांगितेल जाते. मात्र, पलाशने असा कोणत्याही व्हिडीओ सोशल मीडियावर काढला नाही. पलाश मुच्छल याच्या सोशल मीडियावर अजूनही तो व्हिडीओ कायम आहे. स्मृती मानधना आणि पलाश यांचे लग्न 7 डिसेंबर 2025 रोजी होणार असल्याची तूफान चर्चा रंगताना दिसली. मात्र, स्मृती मानधना हिच्या भावाने ही चर्चा खोटी असल्याचे म्हटले.