Sachin Tendulkar : सचिन तेंडूलकरची किचनमध्ये फिरकी, ब्रेट ली म्हणाला….

सचिनने या आगोदर सुद्धा असे अनेक व्हिडीओ व्हायरल केले आहेत.

Sachin Tendulkar : सचिन तेंडूलकरची किचनमध्ये फिरकी, ब्रेट ली म्हणाला....
sachin tendukar
Image Credit source: twitter
| Updated on: Sep 22, 2022 | 3:44 PM

सचिन तेंडूलकर (Sachin tendulkar) आपल्या अनोख्या व्हिडीओसाठी सध्या अधिक प्रसिध्द आहे. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जेव्हा तेंडूलकरने संन्यास घेतला. तेव्हापासून सोशल मीडियावर (Social Media) चाहत्यांसाठी सचिन तेंडूलकर नवीन कल्पना सांगत असतो. तेंडूलकरने एक व्हिडीओ इंस्टाग्रामवरती (Instagram) शेअर केला आहे. त्यामध्ये तो किचनमध्ये आम्लेट बनवत आहे. विशेष आम्लेट कसं तयार करतात हे सुद्धा सचिन त्यांच्या चाहत्यांना सांगत आहे.

सचिन तेंडूलकर क्रिकेटपासून विभक्त झाल्यापासून वेगळ्या गोष्टीतं गुंतल्याचं पाहायला मिळतं. सचिन एका हॉटेलच्या किचनमध्ये आहे.
हे हॉटेल देहरादूनमधील आहे. तिथं सचिन आपली कला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच आम्लेटं तयार कसं करायचं याचे धडे सुद्धा देत आहे.

सचिनने या आगोदर सुद्धा असे अनेक व्हिडीओ व्हायरल केले आहेत. त्यामध्ये तो स्वत: बॅटचा काहीसा भाग पाण्याने धूत आहे, कारण तो खराब झाला. इतर ठिकाणी बॅटला पाणी लागल्यानंतर ती खराब होईल. त्यामुळे कशी काळजी घ्यायची हे सुद्धा तो सांगत आहे.

फ्लिक किंवा फ्लिप, ऑम्लेट नेहमी परिपूर्ण असावे. विशेष म्हणजे सचिनचा हा व्हिडिओ आतापर्यंत साडेचार लाख युजर्सनी लाइक केला आहे.

हा व्हिडीओ सचिन तेंडूलकरने व्हायरल केल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज ब्रेट लीने “मी उद्या ब्रेक फास्टला येतोय अशी कमेंट केली आहे.