रवींद्र जाडेजाला सेमीफायनलमध्ये खेळवा, सचिनचा सल्ला

| Updated on: Jul 08, 2019 | 7:26 PM

आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2019 च्या सेमीफायनलच्या सामन्यात भारतीय संघाचा सामना न्युझीलंडच्या संघाशी होणार आहे. या सामन्यात भारतीय संघात कुणाला स्थान मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

रवींद्र जाडेजाला सेमीफायनलमध्ये खेळवा, सचिनचा सल्ला
Follow us on

मुंबई: आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2019 च्या सेमीफायनलच्या सामन्यात भारतीय संघाचा सामना न्युझीलंडच्या संघाशी होणार आहे. या सामन्यात भारतीय संघात कुणाला स्थान मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, मागील सामन्यात भारतीय संघात युजवेंद्र चहलऐवजी रवींद्र जाडेजाला संधी देण्यात आली होती. जाडेजाने चांगली गोलंदाजी करत 10 षटकात 40 धावा दिल्या आणि एक विकेट घेतली होती. आता सेमीफायनलमध्ये अंतिम 11 मध्ये कुणाला संधी मिळणार हा औत्सुक्याचा विषय आहे.

सचिन तेंडुलकरचा सल्ला

भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सेमीफायनल सामना खेळताना भारतीय संघात मोहम्मद शमी आणि रवींद्र जाडेजाला संधी देण्याचा सल्ला दिला आहे. सचिन म्हणाला, “मी संघ व्यवस्थापनाला जडेजाला संधी देण्याचा सल्ला देईल. जर दिनेश कार्तिक 7 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येणार असेल, तर त्याजागी जाडेजाचा पर्याय अधिक चांगला आहे. मोठ्या सामन्यांमध्ये आपल्याला चांगले पर्याय संघात असणे आवश्यक आहे. कारण आपण 5 गोलंदाजांना संघात घेऊन खेळतो आहे.

सचिनने मोहम्मद शमीला देखील न्युझीलंडविरुद्धच्या सेमीफायनल सामन्यात संधी देण्याचा सल्ला दिला आहे. शमीने आतापर्यंत विश्वचषकात 14 विकेट घेतल्या आहेत. श्रीलंकाविरुद्धच्या सामन्यात शमीला विश्रांती देण्यात आली होती. मात्र, मॅनचेस्टरच्या मैदानावर शमीची गोलंदाजी प्रभावी ठरु शकते. शमीने मॅनचेस्टरमध्येच वेस्टइंडीजविरुद्ध 16 धावा देत 4 विकेट घेतल्या होत्या. त्यामुळे आता मंगळवारी भारतीय संघ कोणत्या 11 खेळाडूंना खेळवणार हे पाहणे अधिक औत्सुक्याचे असेल.