Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरची भविष्यवाणी, सांगितले कोणते संघ T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचतील

आशिया चषकात टीम इंडियाच्या खराब गोलंदाजीमुळे स्पर्धेतून बाहेर पडली होती.

Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरची भविष्यवाणी, सांगितले कोणते संघ T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचतील
sachin tendulkar
Image Credit source: twitter
| Updated on: Oct 18, 2022 | 8:36 AM

नवी दिल्ली : टीम इंडियाचा (Team India) महान फलंदाज सचिन तेंडूलकरने (Sachin Tendulkar) T20 विश्वचषक (T20 World Cup 2022) सुरु झाल्यानंतर एक भविष्यवाणी सांगितली आहे. त्यामध्ये कोणत्या टीम सेमीफायनल पर्यंत पोहचू शकतात हेही सांगितलं आहे. आत्तापर्यंत देशातील अनेक माजी क्रिकेट खेळाडूंनी भविष्यवाणी जाहीर केली आहे. त्यामुळे नेमकी खरी भविष्यवाणी कुणाची खरी ठरणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

आशिया चषकात टीम इंडियाच्या खराब गोलंदाजीमुळे स्पर्धेतून बाहेर पडली होती. परंतु ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि आफ्रिकेविरुद्ध झालेल्या मालिकेत टीम इंडियाच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. त्यामुळे टीम इंडियाने सहज विजय मिळविला.

टीम इंडियातील रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहूल, सुर्यकुमार यादव, हे फलंदाज सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असल्याने टीम इंडिया विश्वचषक जिंकू शकते असं मत सचिन तेंडूलकरने व्यक्त केलं आहे. विशेष म्हणजे अंतिम ओव्हर टाकण्यासाठी टीम इंडियाकडे चांगले गोलंदाज सुध्दा आहेत असंही सचिन म्हणाला आहे.

इंडिया, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिक इ्त्यादी टीम उपांत्य फेरीत पोहोचतील अशी भविष्यवाणी सचिन तेंडुलकरने केली आहे.