AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

America, Israel, Iran War : इराणचा पहिला मोठा विजय; अमेरिकेची ताकद कमी पडली? ट्रम्प यांच्या निर्णयामुळे जगात खळबळ

मध्य पूर्वेतून मोठी बातमी समोर येत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध सुरू असतानाच मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जगभरात मोठी खळबळ उडाली असून, अमेरिकेची ताकद कमी पडली का? असा सवाल उपस्थित होत आहे.

America, Israel, Iran War : इराणचा पहिला मोठा विजय; अमेरिकेची ताकद कमी पडली? ट्रम्प यांच्या निर्णयामुळे जगात खळबळ
DONALD TRUMPImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 11, 2026 | 5:42 PM
Share

युद्धामुळे मध्य पूर्वेत सध्या मोठा तणाव निर्माण झाला आहे. अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. इराणने अमेरिका आणि इस्त्रायलच्या नाकीनऊ आणले आहेत. इराणकडून अमेरिका आणि इस्त्रायलवर भीषण मिसाईल हल्ले सुरू आहेत. या हल्ल्यांमुळे अमेरिकेच्या सैन्यदलाचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. या युद्धात आतापर्यंत अमेरिकेचा पाण्यासारखा पैसा खर्च झाला आहे. काही दिवसांपूर्वी इराणने कोणतीही अट न ठेवता सरेंडर व्हावं अशी मागणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती. मात्र इराणने ट्रम्प यांच्या या मागणीला केराची टोपली दाखवली आहे. आम्ही कधीही सरेंडर होणार नाहीत, असं इराणच्या राष्ट्रपतींनी म्हटलं होतं. हा ट्रम्प यांच्यासाठी मोठा झटका होता. आपण हे युद्ध काही दिवसांमध्ये समाप्त करू, इराणची राजवट उलथून टाकू असं ट्रम्प यांना वाटत होतं. मात्र आता हा डाव ट्रम्प यांच्याच अंगलट आला आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे आता अमेरिकेनं मोठा निर्णय घेतला आहे. इराणच्या मिसाईल हल्ल्यांपासून वाचण्यासाठी अमेरिकेनं दक्षिण कोरियामध्ये तैनात केलेली थाड एअर सिस्टम (THAAD) हळुहळु बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. ही थाड यंत्रणा आता मध्य पूर्वेत तैनात करण्यात येत आहे. मात्र यामुळे दक्षिण कोरिया मोठ्या अडचणीत सापडला आहे. केवळ थाड एअर सिस्टमच नाही तर इतरही अनेक मिलिट्री हार्डवेअर अमेरिकेनं दक्षिण कोरियामधून हलवले आहेत. अमेरिकेच्या सैन्य सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आता दक्षिण कोरियामधील ही सर्व सुरक्षा उपकरणे अमेरिका मध्य पूर्वेत तैनात करणार आहे.

दरम्यान अमेरिकेच्या या निर्णयामुळे दक्षिण कोरियात मोठी खळबळ उडाली आहे.द गार्जियनच्या एका वृत्तानुसार अमेरिकेनं अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे दक्षिण कोरियन सरकारला अमेरिकेच्या हेतूवर संशय निर्माण झाला आहे. दक्षिण कोरियातील विरोधकांनी आता तेथील सरकारला धारेवर धरलं असून, उत्तर कोरियाचा एवढा मोठा धोका असताना अमेरिकेवर विश्वास ठेवण्याची चूक का करण्यात आली? असा प्रश्न तेथील विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे इराणच्या मिसाईलपुढे अमेरिका आणि इस्त्रायलची दाणादाण उडाल्याचं पहायला मिळत आहे. इराणचे मिसाईल हल्ले हे सध्या अमेरिका आणि इस्त्रायल पुढील सर्वात मोठं आव्हान आहेत.

Follow Us
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?