Saina nehwal: अभिनेता सिद्धार्थच्या माफीनाम्यावर सायना नेहवाल झाली व्यक्त, म्हणाली…

अभिनेता सिद्धार्थने (Siddharth)  सायना नेहवालची (Saina nehwal) माफी मागितली आहे. त्यावर फुलराणी सायनने तिचं मत व्यक्त केलय.

Saina nehwal: अभिनेता सिद्धार्थच्या माफीनाम्यावर सायना नेहवाल झाली व्यक्त, म्हणाली...

हैदराबाद: अभिनेता सिद्धार्थने (Siddharth)  सायना नेहवालची (Saina nehwal) माफी मागितली आहे. त्यावर फुलराणी सायनने तिचं मत व्यक्त केलय. “जाहीरपणे सिद्धार्थने माफी मागितली त्याचा आनंदच आहे. पण महिलांना अशा पद्धतीनेच टार्गेट केले जाते” असे सायनाने सांगितले. “सिद्धार्थने माफी मागितली त्याचा आनंद आहे. कारण एका महिलेबद्दल तो हे बोलला होता. कुठल्याही महिलेला अशा प्रकारे टार्गेट करु नये. पण ठीक आहे, मी या गोष्टींचा फार विचार करत नाही” असे सायनाने म्हटले आहे.

सायनाला का टार्गेट केलं?
पाच जानेवारीला पंजाब फिरोजपूरमध्ये गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत त्रुटी राहिल्या होत्या. त्यावर सायनाने टि्वट केले होते. त्या टि्वटला रिप्लाय देताना अभिनेता सिद्धार्थ खूप घाणेरड लैंगिक अंगाने जाणार टि्वट केलं होतं. त्याच हे टि्वट व्हायरल झाल्यानंतर नेटीझन्सची त्याचा चांगलाच समाचार घेतला होता. अनेकांनी सिद्धार्थला स्त्रीद्वेषी ठरवलं होतं. देशाला गौरव प्राप्त करुन देणाऱ्या महिलेबद्दल सिद्धार्थचे हे वर्तन रस्त्यावरच्या छपरीसारख आहे. अशा नमुन्यांना आई-वडिल कसं मोठ करतात? त्याचं आश्चर्य वाटतं, असं एका युजरने म्हटलं होतं.

सिद्धार्थने माफी नाम्यात काय म्हटलय?
“काही दिवसांपूर्वी तुमच्या ट्विटला उत्तर देताना मी लिहिलेल्या जोकबद्दल मी तुमची माफी मागतो आहे. मी तुमच्याशी बर्‍याच गोष्टींवर असहमत असू शकतो. परंतु जेव्हा मी तुमचे ट्विट वाचतो तेव्हा माझा राग शब्दांमध्ये नाही बसत. जर एखादा विनोद समजावून सांगावा लागत असेल, तर तो सुरुवातीला चांगला विनोदच नाही. मी जो विनोद केला त्याबद्दल क्षमस्व आहे” असे सिद्धार्थने म्हटले आहे.

सायनाने काय टि्वट केलं होतं?
“स्वत:च्या पंतप्रधानांच्या सुरक्षेशी तडजोड होत असेल, तर कुठलाही देश आपण सुरक्षित आहोत, असा दावा करु शकत नाही. मी कठोर शब्दात या घटनेचा निषेध करते” असे सायनाने तिच्या टि्वटमध्ये म्हटले होते.


Published On - 2:05 pm, Wed, 12 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI