
टेनिस स्टार सानिया मिर्झा हिने पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक याच्यासोबत घटस्फोट घेतला. मात्र, सानियाने घटस्फोटाबद्दल काही भाष्य करण्याअगोदरच शोएब मलिक याने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत लग्न केले. सना जावेदच्या लग्नाचे काही खास फोटो शोएबने सोशल मीडियावर शेअर केली. त्यानंतर चर्चा रंगली की, शोएबने सानिया हिच्यासोबत घटस्फोट न घेताच सनासोबत लग्न केले. मात्र, सानियाच्या कुटुंबियांनी स्पष्ट सांगितले की, सानियाने अगोदरच शोएबसोबत घटस्फोट घेतला. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा एक मुलगा असून घटस्फोटानंतर त्याची जबाबदारी सानिया हिनेच घेतली. शोएब मलिक याच्यासोबतच्या लग्नानंतर सानिया भारत सोडून दुबईत राहत होती. घटस्फोटानंतरही सानिया मिर्झा हिने दुबई सोडली नाही.
शोएब मलिक याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर अनेक दिवस सानिया त्यावर अजिबातच भाष्य करताना दिसली नाही. सानिया मिर्झा हिने फराह खानच्या शोमध्ये घटस्फोटाबद्दल मोठा खुलासा केला. शोएब मलिक याच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर तिची अवस्था कशी होती हे सांगितले. हेच नाही तर फराह खान हिने तिला त्या वाईट अवस्थेत बघितले होते, ज्यावेळी सानिया थरथर कापत होती आणि रडत होती, त्यावेळी फराह खानने तिला सांभाळले.
आता शोएब मलिक हा सना जावेद हिच्यासोबतही घटस्फोट घेत असल्याचे सांगितले जात आहे. सना जावेद आणि शोएब मलिक यांच्यातील संबंध ताणले असून वाद वाढला आहे. काही दिवसांपूर्वीच शोएब मलिक याच्या बहिणीने खुलासा केला होता की, सानिया मिर्झा चांगली होती. मात्र, शोएब मलिक याच्या अनैतिक संबंधांना ती वैतागली होती आणि यावरूनच यांच्यामध्ये वाद सुरू होता. शोएब आणि सना यांच्या लग्नाला आमच्या कुटुंबातून कोणीही सहभागी झाले नव्हते.
त्यामध्येच आता काही रिपोर्टमध्ये दावा केला जात आहे की, आता शोएब मलिक याच्याकडून चाैथ्या लग्नाची तयारी सुरू आहे. फक्त हेच नाही तर शोएब मलिक आणि सना जावेद एकत्र राहत देखील नाहीत. सानिया मिर्झा हिचा पती चाैथे लग्न करणार असल्याचे कळाल्यापासून मोठी खळबळ उडाली आहे. लोक शोएब मलिक याच्याविरोधात संताप व्यक्त करत असून त्याला खडेबोल सुनावत आहेत.