पतीचा वनडे क्रिकेटला अलविदा, सानिया मिर्झाचा भावूक मेसेज

| Updated on: Jul 06, 2019 | 9:34 PM

पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. यानंतर शोएबची पत्नी आणि भारताची स्टार महिला टेनिस खेळाडू सानिया मिर्झाने शोएबसाठी एक भावूक पोस्ट लिहिली.

पतीचा वनडे क्रिकेटला अलविदा, सानिया मिर्झाचा भावूक मेसेज
Follow us on

मुंबई : पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. यानंतर शोएबची पत्नी आणि भारताची स्टार महिला टेनिस खेळाडू सानिया मिर्झाने शोएबसाठी एक भावूक पोस्ट लिहिली. यात सानियाने तिला आणि मुलगा इज्हानला शोएबच्या कर्तुत्वाचा अभिमान असल्याचे सांगितले.

सानिया म्हणाली, “प्रत्येक गोष्टीचा शेवट होतो. मात्र, आयुष्यात प्रत्येक गोष्टीच्या शेवटानंतर एक नवी सुरुवात होते. तु तुझ्या देशासाठी 20 वर्षे क्रिकेट खेळलास. तु हा खेळ अत्यंत सन्मानाने आणि माणुसपणासह केला. तु जे काही मिळवलं आहे त्यावर मला आणि इज्हानला खूप अभिमान आहे.”

पाकिस्तान बांगलादेशविरुद्धचा सामना जिंकूनही विश्वचषकातून बाहेर पडला. त्यानंतर शोएबने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली. शोएब म्हणाला, “आज मी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. मी ज्या खेळाडू आणि प्रशिक्षकांसोबत खेळलो त्यांचे आभार. तसेच माझ्या कुटुंबीयांचे, मित्रांचे, माध्यम आणि प्रायोजकांचे देखील आभार. विशेष म्हणजे माझ्या चाहत्यांचेही आभार. मी तुम्हा सर्वांवर खूप प्रेम करतो.”

शोएबने 1999 मध्ये त्याचा पहिला एकदिवसीय सामना वेस्ट इंडीजविरुद्ध शरजाह येथे खेळला होता. तसेच त्याने अखेरचा एकदिवसीय सामना या विश्वचषकात भारताविरुद्ध खेळला.