
भारतीय क्रिकेट संघातील स्टार फलंदाज शुबमन गिल याच्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा फार खास ठरलेला नाही आणि त्याला सातत्याने अपयशाचा सामना करावा लागला आहे. टी-20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यातही शुभमन गिलची बॅट चांगली कामगिरी करू शकली नाही आणि तो लवकर बाद झाला. तसेच एकदिवसीय मालिकेतही तो अपयशी ठरला आणि टी-20 मालिकेतील तीनपैकी दोन सामन्यांमध्ये तो अपयशी ठरला. महत्वाची गोष्ट म्हणजे होबार्ट स्टेडियमवर झालेला सामना पाहण्यासाठी सारा तेंडुलकरही स्टेडिअममध्ये आली होती. स्क्रीनवर तिचा चेहरा दिसताच पुढच्याच चेंडूवर शुमबन गिला बाद झाला.
होबार्टमध्ये पहिल्यांदा टी-20 सामना खेळणाऱ्या टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाने 187 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तर देताना अभिषेक शर्माने संघाला वेगवान सुरुवात करून दिली पण तो बाद झाला. त्यानंतर सर्वांच्या नजरा शुबमन गिलकडे वळल्या, जो गेल्या सामन्यातही अपयशी ठरला होता. कर्णधार सूर्यकुमार यादवही गिलसोबत क्रीजवर आला आणि त्याने येताच षटकार मारला.
साराचा चेहरा स्क्रीनवर दिसला
त्यामुळे शुबमनवर जरा फटकेबाजी करून फलंदाजी करण्याचा दबाव वाढवा आणि गिलनेही तशीच फलंदाजी करत शानदार चौकारही लगावला. मात्र त्याने चौकार मारताच स्टेडिअममधील स्क्रीनवर थेट सारा तेंडुलकरचा चेहरा दिसू लागला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तिच्या मैत्रिणीसोबत सामना पाहण्यासाठी आली होती. साराचा फोटो स्क्रीनवर येताच स्टेडियममधील एकच जल्लोष झाला.
Sara Tendulkar’s reaction to Shubman Gill’s boundary 😀 pic.twitter.com/lVlJ9MRQea
— Stupid_Opinions (@IAmCricketGeek) November 2, 2025
पुढच्याच चेंडूवर शुबमन बाद
खरंतर, शुबमन गिल आणि सारा तेंडुलकर यांच्यातील अफेरच्या अफवा अनेकदा पसरल्या आहेत. 2023 च्या वर्ल्डकपपासून ते गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मेलबर्न कसोटीपर्यंत, साराने अनेक वेळा टीम इंडियाच्या सामन्यांना हजेरी लावली आणि तेव्हाही त्या दोघांच्या अफेअरच्या अफवा पसरत होत्या. मात्र, त्यानंतर लवकरच परिस्थिती पूर्णपणे बदलली. कालच्या सामन्यातही सारा स्टेडिअममध्ये उपस्थित होती, मात्र तिचा चेहरा स्क्रीनवर दिसला आणि त्यानंतर पुढल्याच चेंडुवर शुबमन गिल हा LBW (बाद) झाला.
Gill got out, Camera zooms to Sara Tendulkar 😭😭🙏🏻
pic.twitter.com/xNjbH0hwBv https://t.co/DqKHfw7tRz— Sohamdave (@sohamdave45) November 2, 2025
गिलचा फ्लॉप शो सुरूच
गिलला नॅथन एलिसने बाद केले आणि तो 12 चेंडूत फक्त 15 धावा करू शकला. यामुळे शुभमन गिलच्या टी20 क्रिकेटमधील अपयशांची मालिका अद्यापही कायम आहे. 2025 च्या आशिया कपसाठी टी20 संघात पुनरागमन केल्यापासून, गिलला सलग 10 डावांमध्ये एकही अर्धशतक झळकावता आले नाही. तो सतत अपयशी ठरताना दिसत आहे. आत्तापर्यंत त्याचा सर्वात मोठा स्कोअर हा 47 होता, ही खेळी त्याने पाकविरुद्ध केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात तो चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता, त्याने 37 धावा केल्या होत्या, परंतु पावसामुळे सामना वाया गेला.