रोहित शर्माच्या बुटांवर नेमकं असं काय होतं, ज्याने संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं?

| Updated on: Apr 11, 2021 | 3:20 PM

रोहितने सामन्याच्या दिवशी पायत घातलेल्या बुटांवर एक चित्र होतं. या चित्रामुळे अनेक क्रिकेटप्रेमी आणि प्राणीमित्रांनी रोहितचं कौतुक केलं आहे (Save the Rhino message on Rohit Sharma shoes).

रोहित शर्माच्या बुटांवर नेमकं असं काय होतं, ज्याने संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं?
Follow us on

मुंबई : आयपीलच्या 14 व्या मोसमाला सुरुवात झालीय. या मोसमाचा पहिला आणि सलामीचा सामना हा शुक्रवारी (9 एप्रिल) मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात बंगळुरुने मुंबई इंडियन्सवर 2 विकेट्सने विजय मिळवला होता. या सामन्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. रोहितने सामन्याच्या दिवशी पायात घातलेल्या बुटांवर एक चित्र होतं. या चित्रामुळे अनेक क्रिकेटप्रेमी आणि प्राणीमित्रांनी रोहितचं कौतुक केलं आहे (Save the Rhino message on Rohit Sharma shoes).

नेमकं असं काय होतं त्या बुटांवर?

रोहितने सामन्याच्या दिवशी पायात घातलेल्या बुटांवर शिंगी गेंड्यांचे चित्र होते. त्याच्या बुटांवर शिंगी गेंड्यांचे चित्र असण्यामागे महत्त्वाचं कारण होतं. सध्या शिंगी गेंड्यांची प्रजाती ही लुप्त होत चालली आहे. ही प्रजाती नष्ट झाली तर कदाचित निसर्गातील परिसंस्थेवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे गेंड्यांच्या संरक्षणासाठी आणि त्याबाबत जनजागृती करण्यासाठी रोहितने गेंड्यांचे चित्र असलेले बुट घातले होते. विशेष म्हणजे त्याच्या बुटांवर सेव्ह द रायनो म्हणजेच गेंड्यांना वाचवा असा संदेशही लिहिण्यात आला होता.

रोहितचं याबाबत ट्विट

रोहितने याबाबत ट्विट करुन आपली भावना व्यक्त केलीय. “शुक्रवारचा सामना हा माझ्यासाठी फक्त सामना नव्हता, सामन्याच्या पलिकडेही आणखी काही महत्त्वाचं होतं. क्रिकेट खेळणं हे माझं स्वप्न होते. त्याचबरोबर जगातील काही गोष्टींचं जतन करणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. ते आपण मिळून सगळ्यांनी करायला हवे. मला आवडणाऱ्या गेंड्यांची प्रजाती लुप्त होण्यापासून वाचवण्यासाठी मैदानात उतरणं हे देखील खास आहे”, असं रोहित शर्मा ट्विटरवर म्हणाला. रोहितचा हा उपक्रम अनेक प्राणीमित्रांना आवडला.

इंग्लंडचा पीटरसनही खूश

रोहित शर्माच्या या ट्विटवर इंग्लंडचा दिग्गज खेळाडू केविन पीटरसन याने प्रतिक्रिया दिली. त्याला रोहितचा हा प्रयत्न खूप आवडला. विशेष म्हणचे रीटरसन हा देखील एक प्राणीमित्र आहे. याशिवाय गेंड्यांची संख्या कमी होतेय यावर त्याने अनेकवेळा चिंता व्यक्त केलीय. गेंड्यांची संख्या वाढवण्यासाठी त्याने स्वत: अनेकदा पुढाकार घेतल्याचं समोर आलं आहे.

हेही वाचा : आयपीएलच्या पहिल्या दोन मॅचमध्ये भारताचे दोन दिग्गज खेळाडू जखमी, भारताची डोकेदुखी वाढली!