IND vs NZ: गिलच्या एका चुकीमुळे टीम इंडियाचं 34 धावांचे नुकसान, केएल राहुलही भडकला, पाहा Video

Shubman Gill Drop Catch: भारतीय कर्णधार शुभमन गिलकडून मोठी चूक झाली आहे. गिलमुळे भारतीय संघाचे मोठे नुकसान झाले आहे.

IND vs NZ: गिलच्या एका चुकीमुळे टीम इंडियाचं 34 धावांचे नुकसान, केएल राहुलही भडकला, पाहा Video
| Updated on: Nov 07, 2026 | 11:50 AM

IND vs NZ 2nd ODI Match: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वनडे सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा वनडे सामना सुरु आहे. या सामन्याचे नाणेफेक भारतीय संघाने जिंकले. कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात कर्णधार शुभमन गिलकडून एक मोठी चूक झाली. ज्याचा फटका भारतीय संघाला मोठं नुकसान होणार आहे.

शुभमन गिलने एक महत्त्वाचा कॅच सोडला. न्यूझीलंडच्या डावातील १७ व्या षटकात घडली. अंशुल कंबोज आपले पाचवे षटक टाकत असताना, त्याने दुसरा चेंडू बॅक-ऑफ-लेंथ टाकला. डॅरिल मिचेलने तो चेंडू लेग साईडच्या दिशेने जोरात मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या बॅटच्या वरच्या भागाला लागून हवेत उंच उडाला आणि मिड-ऑफच्या दिशेने गेला, जिथे शुभमन गिल उभा होता.

Loading...

गिलकडे चेंडूचा अंदाज घेण्यासाठी कॅच पकडण्यासाठी पुरेसा वेळ होता. योग्य स्थितीत असूनही आणि दोन्ही हातांनी झेल घेण्याचा प्रयत्न करूनही, चेंडू त्याच्या हातातून निसटला. यामुळे ३४ चेंडूंमध्ये २१ धावांवर फलंदाजी करत असलेल्या मिचेलला जीवदान मिळाले. नंतर मिचेलने आपले अर्धशतक पूर्ण केले. तो ५५ धावा करुन बाद झाला. एकूण ३४ धावांचे नुकसान भारतीय संघाचे शुभमन गिलमुळे झाले.

या घटनेनंतर, कॅमेऱ्याने केएल राहुलवर लक्ष केंद्रित केले, जो या कॅच सुटल्यानंतर फार निराश दिसला. मिचेलसुद्धा पॅव्हेलियनच्या दिशेने चालत असताना जागेवरच थांबला. जर गिलने तो झेल घेतला असता, तर भारताने न्यूझीलंडवर आणखी दबाव टाकला असता, कारण पाहुणा संघ आधीच ४५ धावांवर ३ गडी गमावून अडचणीत होता. राहुल यानंतर रागात पाहायला मिळाला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us