
भारताची नामवंत महिला क्रिकेटर स्मृती मानधना हिचं संगीतकार पालश मुच्छलशी 23 नोव्हेबरला लग्न होणार होतं, तिच्या वडिलांच्या प्रकृतीमुळे ते पुढे ढकलण्यात आलं. मात्र त्यानंतर अनेक अपवा उठू लागल्या, पलाशने तिला चीट केल,ं तो दुसऱ्या मुलीसोबत पकडला गेला, एक ना दोन अनेक थिअरीज, चर्चा समोर येऊ लागल्या आणि बघता बघता हे प्रकरण सर्वदूर चर्चिलं जाऊ लागलं. मात्र स्मृती किंवा पलाश यांच्यापैकी कोणीच काही भाष्य केलं नाही. लग्न पुढे ढकलल्यानंतर स्मृतीने तिच्या इन्स्टा प्रोफाईलवरून लग्नाशी संबंधित फोटो, पोस्ट हटवल्या, प्रपोझलचा व्हिडीओही काढून टाकला, त्यामुळे तर अफवांना आणखीनच बळ मिळालं.
हे सगलं प्रकरण होऊन आता 10 दिवस उलटले तरी स्मृती किंवा तिच्या घरच्यापैकी कोणीच बोलायला तयरा नाही. तर दुसरीकडे पलाशची आई ही मात्र लग्न होणार असल्याचे सांगत आहे, लवकरच सुनेला घरी घेऊन येऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 7 डिसेंबरला त्यांचं लग्न होणार, अशा अफवा मध्येच सुरू झाल्या, त्यातच 2 दिवसांपूर्वी पलाश आणि त्याची आई हे एअरपोर्टवरही स्पॉट झाले होते.
पलाशने घेतला मोठा निर्णय
एअरपोर्टवर दिसल्यावर पलाशने काही बोलणं टाळलं. पण त्यानतंर आता त्याने मोठा निर्णय घेतला आहे. लग्न टळल्यानंतर पलाश मुच्छल हा त्याच्या आईसोबत थेट प्रेमानंद महाराज यांच्या आश्रमात गेला. तिथले त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, भर गर्दीत तो चेहऱ्यावर मास्क घालून बसलेला दिसत असून, त्याचा आजूबाजूला बॉडीगार्डही आहेत.
प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात पलाश दाखल
प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात पलाशचा फोटो व्हायरल झाल्यानंतर लगेचच, रेडिटर्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या. बहुतेक सोशल मीडिया युजर्सनी,पलाशवर टीका केली. स्मृती मानधनाची फसवणूक केल्याच्या अफवा असताना पलाशने “सहानुभूती मिळवण्याचा” प्रयत्न केल्याबद्दल नेकांनी त्याच्यावर टीकास्त्र सोडलं. “हे खूप लाजिरवाणं आहे, लोकं आता फक्त सहानुभूती मिळवण्यासाठी असे करतात. त्यांनी धर्माची थट्टा मांडली आहे” असं एका युजरने लिहीलं. तर पलाशच्या व्हायरल फोटोवर दुसऱ्यानेही कमेंट केली आहे. ‘व्हिडिओमध्ये त्याचा बॉडीगार्ड आणि त्याची आई देखील आहेत, काहीतरी गडबड आहे याचे हे खरोखरच स्पष्ट संकेत आहे.’ असं त्याने लिहीलं. ” घोटाळा केल्यानंतर लोकप्रेमानंद महाराजांकडे का जातात?” असा सवाल एका युजरने विचारला. लोकांनी त्याच्यावर सडेतोड टीका केली आहे.
7 तारखेला स्मृती-पलाशचं लग्न ?
23 नोव्हेंबरला सांगतील पलाश-स्मृतीचं लग्न होतं, तिच्या वडिलांना हार्ट अॅटक आल्यावर ते पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर पलाशचीही तब्येत बिधडली. उपचारानंतर तो कुटुंबासह मुंबईत आला, तर स्मृती तिच्या कुटुंबियांसह वडिलांसोबत आहे. त्याचं लग्न कधी याबद्दल कोणीच काही बोलेना. या विलंबामागील कारणाबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत, काही जणांचा असा दावा आहे की पलाशची कथित चीटिंग हे कारण असू शकते.तरव आता गेल्या काही दिवसांपासू अशा अफवा उठत आहेत की पलाश व स्मृती 7 तारखेला लग्न करत आहेत. मात्र स्मृतीच्या भावाने, श्रवण मानधना याने या सर्व बातम्या चुकीचे असल्याचे सांगत लग्नाची तारीख ठरली नसल्याचे स्पष्ट केले आहे.
Palash Muchhal went to Premanandji Maharaj. He thinks all problems related to jersey no. 18 are solved here. pic.twitter.com/3IbdxttLWs
— Sagar (@sagarcasm) December 3, 2025