Sourav Ganguly : लाज वाटते तुझी…सौरव गांगुलीची निंदा, नालस्ती, भारत-पाक सामन्यावरुन जे बोलला लोक खवळले

Sourav Ganguly : सध्या भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली ट्रोलर्सच्या रडारवर आहे. सोशल मीडियावर त्याला भरपूर ट्रोल करण्यात येतय. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरुन सौरव गांगुली जे बोललाय त्यामुळे लोक खवळले आहेत.

Sourav Ganguly : लाज वाटते तुझी...सौरव गांगुलीची निंदा, नालस्ती, भारत-पाक सामन्यावरुन जे बोलला लोक खवळले
sourav ganguly
| Updated on: Jul 28, 2025 | 1:56 PM

भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार सौरव गांगुली आपल्या एका वक्तव्यामुळे पूर्णपणे अडचणीत सापडला आहे. नुकतच त्याने आशिया कप 2025 स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल आपलं मत व्यक्त केलं. त्यानंतर सोशल मीडियावर त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातय. आशिया कप 2025 स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा झाली आहे. या टुर्नामेंटमध्ये भारत-पाकिस्तान दरम्यान 14 सप्टेंबरला ग्रुप स्टेजचा सामना होणार आहे. सौरव गांगुली या मॅचबद्दल असं काही बोलला की, ते चाहत्यांना अजिबात पटलं नाही. सौरव गांगुली आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हणाला की, खेळ झाला पाहिजे. सोबतच पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दलही मोठी गोष्ट बोलला.

सौरव गांगुली ANI शी बोलला. “मला काही समस्या नाही. खेळ सुरु राहिला पाहिजे. पहलगाममध्ये जे झालं, ते नाही झालं पाहिजे. पण खेळ सुरु राहिला पाहिजे. दहशतवाद असू नये. तो रोखलाच पाहिजे. भारताने दहशतवादाविरुद्ध कठोर पावलं उचलली आहेत” सौरव गांगुलीच हे स्टेटमेंट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झालं.

पाकिस्तानकडून भारताच्या लष्करी आणि नागरी वस्त्यांवर हल्ल्याचा प्रयत्न

22 एप्रिल 2025 रोजी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. पाकिस्तानातून आलेल्या अतिरेक्यांनी हा हल्ला घडवून आणला. भारतात आजही लोक पहलगाम विसरलेले नाहीत. भारताने 7 ते 10 मे दरम्यान ऑपरेशन सिंदूर लॉन्च करुन पाकिस्तानला अद्दल घडवली. पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणं उद्धवस्त केली. पाकिस्तानने लष्करी आणि नागरी वस्त्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण भारताच्या मजबूत एअर डिफेन्स सिस्टिमन त्यांचा डाव यशस्वी होऊ दिला नाही.


सुनावल्यानंतर लीजेंड्स टीमचा नकार

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स 2025 टूर्नामेंटमध्ये भारतीय खेळाडूंनी पाकिस्तान विरुद्ध खेळण्यास नकार दिला. त्यामुळे हा सामना रद्द करावा लागला. भारतात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. सोशल मीडियावर खेळाडूंना भरपूर सुनावलं. त्यानंतर लीजेंड्स टीमने पाकिस्तान विरुद्ध खेळण्याचा निर्णय बदलला.


आशिया कप 2025 स्पर्धा कधी सुरु होतेय?

आशिया कप 2025 स्पर्धा 9 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. 28 सप्टेंबरला फायनल होणार आहे. भारताचा पहिला सामना 10 सप्टेंबरला UAE विरुद्ध आहे.