AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK T20 World Cup : पाकिस्तानने स्वत:चा पाय कुऱ्हाडीवर मारला, भारताविरुद्ध न खेळल्यामुळे त्यांना किती मोठा आर्थिक फटका बसेल?

IND vs PAK T20 World Cup : पाकिस्तानने टी 20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारताविरुद्ध न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाला या निर्णयाची मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. PCB ला काय आणि किती फटका बसेल? ते समजून घ्या.

IND vs PAK T20 World Cup : पाकिस्तानने स्वत:चा पाय कुऱ्हाडीवर मारला, भारताविरुद्ध न खेळल्यामुळे त्यांना किती मोठा आर्थिक फटका बसेल?
ind vs pakImage Credit source: PTI
| Updated on: Feb 02, 2026 | 9:44 AM
Share

Pakistan To Boycott Match Against India : T20 वर्ल्ड कप 2026 सुरु होण्याआधी एक नवीन वाद सुरु झाला आहे. पाकिस्तानी टीमने वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्ध खेळण्यास नकार दिला आहे. 15 फेब्रुवारीला ते भारताविरुद्ध मॅच खेळायला मैदानावर उतरणार नाहीत. पाकिस्तान सरकारने स्वत: या निर्णयाची घोषणा केली आह. पाकिस्तानी टीम टी 20 वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणार आहे. पण ते ग्रुप स्टेजमध्ये भारताविरुद्ध मॅच खेळणार नाहीत. याला फॉरफिट मानलं जाईल. त्यामुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान होणार आहे.

पाकिस्तानी टीम 15 फेब्रुवारीला कोलंबोमध्ये भारताविरुद्ध ग्रुप स्टेजचा सामना खेळण्यासाठी उतरणार नाही. सामना अशा प्रकारे सोडून दिल्यामुळे भारताला 2 पॉइंट्स मिळतील. ग्रुप ए मधून क्वालिफिकेशनसाठी हा मोठा झटका असेल. कारण सुपर 8 मध्ये पोहोचण्यासाठी पॉइंट्स आणि नेट रनरेट खूप महत्वाचा ठरणार आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानचा नेट रनरेट निगेटिव सुद्धा जाऊ शकतो. पाकिस्तानी टीम ग्रुप स्टेजमध्ये एकही मॅच हरल्यास ते टुर्नामेंट बाहेर जाऊ शकतात.

ब्रॉडकास्टरचं या एका मॅचमुळे किती नुकसान होईल?

भारत-पाकिस्तान मॅच सर्वाधिक कमाईचा सामना असतो. रिपोर्ट्सनुसार, या एका मॅचमुळे ब्रॉडकास्टर आणि स्पॉन्सरच्या रेवेन्यूमध्ये जवळपास 38 मिलियन डॉलर जवळपास 320 कोटी रुपयांचं नुकसान होऊ शकतं. त्यासाठी ब्रॉडकास्टर्स पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाविरुद्ध खटला सुद्धा दाखल करु शकतात.

पाकिस्तानी बोर्डाचं किती आर्थिक नुकसान होईल?

दुसरीकडे आयसीसीच्या 2024 ते 27 मिडिया राइट्स डील जवळपास 29 हजार कोटी रुपयांची आहे. याचा बहुतांश हिस्सा भारतीय बाजारपेठेतून येतो. पाकिस्तानच्या या निर्णयाचा परिणाम डीलवरही होईल. पाकिस्तानचा वार्षिक आयसीसी रेवेन्यू शेअर जवळपास 34.5 मिलियन डॉलर (जवळपास 300 कोटी रुपये) आहे. या एका निर्णयामुळे हा सर्व रेवेन्यू थांबवला जाऊ शकतो किंवा कापला जाऊ शकतो. पीसीबीची आर्थिक स्थिती आधीपासूनच कमकुवत आहे. हे नुकसान त्यांच्यासाठी मोठा झटका ठरु शकतं. आयसीसी टुर्नामेंटच्या नियमानुसार अशा प्रकारे सामना न खेळल्यास पाकिस्तानवर दंडही आकारला जाऊ शकतो.

आयसीसीकडून काय कारवाई होईल?

पाकिस्तानच्या या कृतीनंतर आयसीसीकडून मोठी कारवाई होऊ शकते. द्विपक्षीय मालिकांना स्थगिती, आशिया कपमध्ये सहभागी होऊ न देणं, पीएसएलसाठी परदेशी खेळाडूंची एनओसी रोखणं. सोबतच पाकिस्तानला कुठल्याही टुर्नामेंटच्या यजमानपदापासून लांब ठेवलं जाऊ शकतं.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...