AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृतीत सुधारणा, डॉक्टरांकडून तब्येतीबाबत मोठी अपडेट, या आजाराची लक्षणं

मोठी बातमी समोर येत आहे, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तब्येत अचानक खालावली आहे, त्यांना शुक्रवारी रात्री उशिरा उपाचासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृतीत सुधारणा, डॉक्टरांकडून तब्येतीबाबत मोठी अपडेट, या आजाराची लक्षणं
Manoj Jarange Patil Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 15, 2026 | 1:02 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक खालावली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा अचानक त्यांना त्रास सुरू झाल्यामुळे, मनोज जरांगे पाटील यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील गॅलक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर सध्या गॅलक्सी रुग्णालयात उपचार सुरू असून, डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. काल रात्री पेक्षा सकाळी त्यांच्या तब्येतीत सुधारणा दिसून येत असल्याची माहिती डॉक्टर विनोद चावरे  यांनी दिली आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांना टायफाईडची लक्षणं दिसून येत असल्याचंही यावेळी चावरे यांनी म्हटलं आहे.

मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर येत्या 29 ऑगस्टला पासून आंदोलनाला सुरुवात करणार आहेत. कुणबी प्रमाणपत्र रद्द होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर या आंदोलनाला महत्त्व प्राप्त झालं आहे. राज्यभरातील मराठा बांधवांनी अंतरवाली सराटी येथे उपस्थित रहावं असं आवाहनही मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आलं आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी नुकताच पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला. मराठी बांधवांच्या गाठीभेटी घेतल्या. मात्र त्यानंतर आता त्यांची प्रकृती बिघडली आहे.

शुक्रवारी रात्री त्यांना अचानक त्रास जाणवू लागल्याने त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरमधील गॅलक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना डॉक्टरांनी सांगितलं की, काल रात्री पेक्षा सकाळी त्यांच्या तब्येतीत सुधारणा दिसून येत आहे, मनोज जरांगे पाटील यांना टायफाईडची लक्षणं दिसून येत आहे, अशी माहिती डॉक्टर चावरे यांनी दिली आहे.

दरम्यान 29 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची हाक दिली आहे, या आंदोलनाला आता अवघे काही दिवस शिल्लक असतानाच जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे मनोज जरांगे आता काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या आंदोलनाला मराठा बांधवांची तुफान गर्दी होण्याची शक्यता आहे.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...