प्रसिद्ध अभिनेत्याचे गर्लफ्रेंडसोबतचे Private Photo व्हायरल; म्हणाला,”मी त्याला ठार मारेन…
Sorab Bedi On Viral Photo: अभिनेता, मॉडेल आणि 'स्प्लिट्सव्हिला' फेम सौरव बेदी गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.

Sourav Bedi On Photo: अभिनेता, मॉडेल आणि ‘स्प्लिट्सव्हिला’ फेम सौरव बेदी गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. तो डेलनाझ दारूवालासोबत रिलेशनशिपमध्ये आहे, जी त्याच्यापेक्षा नऊ वर्षांनी मोठी आहे. त्याने डेलनाझसोबतचे काही खासगी फोटो शेअर करून आपले नाते अधिकृत केले, ज्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. त्यांच्या फोटोंमुळे मोठा वादही निर्माण झाला होता आणि आता सौरवने या ट्रोलिंगवर उघडपणे प्रतिक्रिया दिली आहे.
अलीकडेच, सौरव बेदी नयनदीप रक्षितच्या पॉडकास्टवर दिसला. यावेळी सोराबने ट्रोलिंग आणि डेलनाझ दारूवालासोबतच्या त्याच्या नात्यावर उघडपणे चर्चा केली. त्याने सांगितले की जेव्हा त्याने डेलनाझसोबतचे नाते अधिकृत केले तेव्हा त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला, परंतु तिच्यासोबत खासगी फोटो शेअर केल्याबद्दल त्याला कोणताही पश्चात्ताप नाही. यावेळी सौरवला डेलनाझला मिळणाऱ्या अश्लील कमेंट्सबद्दलही विचारण्यात आले. त्यावर तो म्हणाला, “मी सभ्य लोकांमध्ये आहे. जर एखादा मुलगा माझ्यासमोर येऊन एकदा असं बोलला, तर मी त्याला ठार मारेन.”
सौरव आणि डेलनाझ यांच्या वयात नऊ वर्षांचे अंतर आहे. त्यांच्या वयाच्या अंतराबद्दल बोलताना तो म्हणाला की, णला मिळणारी ट्रोलिंग अन्यायकारक आहे. आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या स्त्रीकडे आकर्षित होणारा तो पहिला किंवा एकमेव व्यक्ती नाही. या ट्रोलिंगचा त्यांच्यावर परिणाम होतो का, असेही सौरवला विचारण्यात आले. अभिनेत्याने नकारार्थी उत्तर दिले आणि डेलनाझ त्याला प्रोजेक्ट्स मिळवून देण्यास मदत करते यावरही सौरवने प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, जरी डेलनाझ त्याला प्रोजेक्ट्स मिळवून देत असली, तरी त्यात अडचण काय आहे?
सोशल मीडियावर होणाऱ्या सततच्या ट्रोलिंगमुळे सोराब खूप व्यथित झाला आहे. त्याने आपला राग व्यक्त करत ट्रोलर्सना प्रत्युत्तर दिले आहे. या अभिनेत्याने असेही म्हटले आहे की, जर कोणी त्याला किंवा त्याच्या जवळच्या लोकांना इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला, तर तो त्यांना ठार मारेल. त्याच्या या वक्तव्याचीही मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे.