AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुनील शेट्टीची लेक KL Rahul च्या फिटनेसवर फिदा, फोटोवर कमेंट करुन म्हणाली…

के एल राहुलच्या एका फोटोवर बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची लेक आणि केएलची रुमर्ड गर्लफ्रेंड आथिया शेट्टीने (Athiya Shetty) कमेंट केली आहे. (Sunil Shetty Daughter Athiya Shetty Comment on KL Rahul Photo)

सुनील शेट्टीची लेक KL Rahul च्या फिटनेसवर फिदा, फोटोवर कमेंट करुन म्हणाली...
आथिया शेट्टी आणि के एल राहुल
| Updated on: May 26, 2021 | 1:43 PM
Share

मुंबई : भारताचा आक्रमक बॅट्समन के एल राहुल (KL Rahul) आयपीएलच्या 14 व्या मोसमादरम्यान अचानक आजारी पडला. त्याच्या पोटाच्या विकाराने आयपीएल (IPL 2021) स्थगितीअगोदरच्या उर्वरित सामन्यांना त्याला मुकावं लागलं. पण शस्त्रक्रियेनंतर आता तो पूर्णपणे फिट झाला आहे. भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर (India Tour of England) जातोय. तिथे न्यूझीवंडविरुद्धचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना (WTC Final 2021) आणि इंग्लंडविरोधात पाच सामन्यांची कसोटी मालिका भारताला खेळायची आहे. या भारतीय संघात के एल राहुलचा समावेश आहे. त्याअगोदर के एल राहुल पूर्णपणे फिट झाला असून तो सध्या सरावात व्यस्त आहे. सराव करतानाच्या त्याच्या एका फोटोवर बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची लेक आणि केएलची रुमर्ड गर्लफ्रेंड आथिया शेट्टीने (Athiya Shetty) कमेंट केली आहे. (Sunil Shetty Daughter Athiya Shetty Comment on KL Rahul Photo)

वर्कआऊट करतानाचा राहुलचा फोटो

काही रिपोर्टनुसार सुनील शेट्टीची लेक आथिया शेट्टी आणि के एल राहुल गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करतायत. इंग्लंड दौऱ्यावर जाण्याआधी वर्कआऊट करतानाचा एक व्हिडीओ राहुलने शेअर केला. ज्याच्यावर आथियाने कमेंट केली आहे.

View this post on Instagram

A post shared by KL Rahul? (@rahulkl)

आथिया शेट्टीची खास कमेंट

के.एल. राहुलने वर्कआऊटचा फोटो फोटो शेअर करताना ‘…और फिर हम उठेंगे’ असं कॅप्शन दिलं. याच फोटोवर आथियाने कमेंट केली. हास्याची इमोजी पोस्ट करत के एल राहुलच्या म्हणण्याला तिने साथ दिल्याचं दिसतंय.

Athiya Shetty Comment on KL Rahul Photo

आथिया शेट्टीची कमेंट

आथियाकडून नुकत्याच राहुलला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आथियाने के एल राहुलला खास अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने इन्स्टाग्रामवर राहुलसोबतचे दोन फोटो शेअर करत, “मैं तुम्हारे लिए शुक्रगुजार हूँ… हॅप्पी बर्थडे”, असं लिहित हर्ट इमोजी पोस्ट केली आहे.

राहुल आणि आथियाची नुसती चर्चाच चर्चा…!

गेल्या अनेक दिवसांपासून के एल राहुल आणि आथिया शेट्टीमधल्या रिलेशनशीपबद्दल नुसत्या चर्चाच आहेत. आथिया आणि राहुल एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात तसंच एकमेकांनी पोस्ट केलेल्या फोटोखाली कमेंटही करत असतात. दोघांनीही आपल्या नात्याविषयी आणखी जगाला खुलेपणाने सांगितलेलं नाहीय. पण काही असो, सध्या तरी त्यांच्यात ‘प्रेमाचा खुबसुरत अंदाज’ पाहायला मिळतोय.

(Sunil Shetty Daughter Athiya Shetty Comment on KL Rahul Photo)

हे ही वाचा :

Photo : ‘अरे बाबांनो मी तिचा मालक नाहीय’, इरफान खान बायकोच्या त्या फोटोवरुन ट्रोलर्सवर भडकला

Video : है तय्यार हम! भारतीय क्रिकेटपटूंचा सराव जोमात सुरु

‘तो’ पराभव जिव्हारी, आंद्रे रसेलचा आयपीएलमधील शॉवर किस्सा!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.