IPL 2021 : राहुलच्या बॅटमधून वाढदिवशी खणखणीत अर्धशतक, आथिया शेट्टी खूश, म्हणते…

गेल्या अनेक दिवसांपासून के एल राहुल आणि आथिया शेट्टीमधल्या रिलेशनशीपबद्दल नुसत्या चर्चाच आहेत. (KL Rahul Fantastic Knock PBKS vs DC Athiya Shetty Instagram post)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 7:15 AM, 19 Apr 2021
IPL 2021 : राहुलच्या बॅटमधून वाढदिवशी खणखणीत अर्धशतक, आथिया शेट्टी खूश, म्हणते...
के एल राहुल आणि आथिया शेट्टी

मुंबई : पंजाबचा कर्णधार के एल राहुलची (KL Rahul) बॅट वाढदिवसादिनी चांगलीच बोलली. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या (Delhi Capitals) मॅचमध्ये त्याने शानदार अर्धशतक झळकावलं. वाढदिवसादिनी के एल राहुलने आपल्या बॅटची जादू दाखवल्याने त्याची रुमर्ड गर्लफ्रेंड आशिया शेट्टी (Athiya Shetty) भलतीच खूश झाली आहे. इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट लिहून तिने त्याचं अभिनंदन केलं आहे तसंच वाढदिवसादिनी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. (IPL 2021 Birthday Boy KL Rahul Fantastic Knock PBKS vs DC Athiya Shetty Instagram post)

राहुलचं शानदार अर्धशतक, मयांकसोबत शतकी भागिदारी

आयपीएलच्या 14 पर्वातील 11 वा सामना पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात वानखेडे मैदानावर पार पडला. या सामन्यात के एल राहुलने 51 बॉलमध्ये शानदार 61 रन्स ठोकले. या खेळीत त्याने 7 खणखणीत चौकार आणि 2 उत्तुंग षटकार लगावले. याचसोबत त्याने मयांक अग्रवालसोबत 122 धावांची शानदार सलामी भागिदारी केली.

राहुलच्या बॅटची जादू पाहिली, आथिया खूश झाली!

वाढदिवसादिनी राहुलने सुंदर बॅटिंग केलेली पाहून त्याची रुमर्ड गर्लफ्रेंड आथिया खूश झाली. तिने आपला आनंद एका पोस्टद्वारे व्यक्त केला. तिने इन्स्टाग्राम पोस्ट लिहित त्याच्यासोबतचा एक फोटो पोस्ट करत त्याच्या खेळीबद्दल त्याचं अभिनंदन केलं तसंच त्याच्या वाढदिवसादिनी खास शुभेच्छा दिल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Athiya Shetty (@athiyashetty)

आथियाकडून राहुलला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आथियाने के एल राहुलला खास अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने इन्स्टाग्रामवर राहुलसोबतचे दोन फोटो शेअर करत, “मैं तुम्हारे लिए शुक्रगुजार हूँ… हॅप्पी बर्थडे”, असं लिहित हर्ट इमोजी पोस्ट केली आहे.

राहुल आणि आथियाची नुसती चर्चाच चर्चा…!

गेल्या अनेक दिवसांपासून के एल राहुल आणि आथिया शेट्टीमधल्या रिलेशनशीपबद्दल नुसत्या चर्चाच आहेत. आथिया आणि राहुल एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात तसंच एकमेकांनी पोस्ट केलेल्या फोटोखाली कमेंटही करत असतात. दोघांनीही आपल्या नात्याविषयी आणखी जगाला खुलेपणाने सांगितलेलं नाहीय. पण काही असो, सध्या तरी त्यांच्यात ‘प्रेमाचा खुबसुरत अंदाज’ पाहायला मिळतोय.

(IPL 2021 Birthday Boy KL Rahul Fantastic Knock PBKS vs DC Athiya Shetty Instagram post)

हे ही वाचा :

IPL 2021 : पांड्या भाऊ आणि जावा-जावांचा स्वॅगच वेगळा, हॉटेलच्या गार्डनमधून डान्स, पाहा जबरदस्त Video

Shikhar Dhawan | गब्बरची जब्बर खेळी, पटकावली ऑरेंज कॅप

DC vs PBKS, IPL 2021 Match 11 Result | ‘गब्बर’ शिखर धवनची शानदार खेळी, दिल्लीचा पंजाबवर 6 विकेट्सने दमदार विजय