Shikhar Dhawan | गब्बरची जब्बर खेळी, पटकावली ऑरेंज कॅप

शिखर धवनने (shikhar dhawan) पंजाब किंग्स (punjab kings) विरुद्धच्या सामन्यात 92 धावांची खेळी केली.

Shikhar Dhawan | गब्बरची जब्बर खेळी, पटकावली ऑरेंज कॅप
शिखर धवनने (shikhar dhawa) पंजाब किंग्स (punjab kings) विरुद्धच्या सामन्यात 92 धावांची खेळी केली.
Follow us
| Updated on: Apr 19, 2021 | 12:02 AM

मुंबई : आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021) 11 वा सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने (delhi capitals) पंजाब किंग्सवर (punjab kings) 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. पंजाबने दिल्लीला विजयासाठी 196 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान दिल्लाने 18.2 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 198 धावा केल्या. सलामीवीर ‘गब्बर’ शिखर धवन दिल्लीच्या विजयाचा शिल्पकार ठरला. धवनने शानदार 92 धावांची खेळी केली. (ipl 2021 dc vs pbks delhi capitals shikhar dhawan scored 92 runs against punjab kings)

शिखरने एकूण 49 चेंडूत 13 चौकार आणि 2 सिक्ससह 92 धावा केल्या. दुर्देवाने शिखर नर्व्हस नाईंटीचा शिकार ठरला. अवघ्या 8 धावांनी शिखरचे शतक हुकले. पण शिखरने दिल्लीच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. त्याने केलेल्या या कामगिरीसाठी शिखरचा ‘मॅन द मॅच’ या पुरस्काराने गौरवण्यात आले.

ऑरेन्ज कॅपचा मानकरी

शिखरने या 92 धावांच्या खेळीसह ऑरेन्ज कॅपही पटकावली आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेन्ज कॅप देण्यात येते. शिखरने या मोसमात आतापर्यंत 3 सामन्यात 186 धावा केल्या आहेत.

पॉइंट्सटेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर झेप

दिल्लीने या विजयासह पॉइंट्सटेबलमध्ये मुंबई इंडियन्सला पछाडत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. दिल्लीचा आजचा दुसरा विजय ठरला. दिल्ली 4 पॉइंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर पोहचली आहे. मुंबई आणि दिल्लीचे पॉइंट्स समान आहेत. मात्र दिल्लीचा नेट्स रन रेट चांगला असल्याने दुसऱ्या क्रमांकावर मजल मारली आहे.

दिल्लीचा पुढील सामना केव्हा?

दिल्लीचा पुढील सामना 20 एप्रिलला चेन्नईत खेळवण्यात येणार आहे. या साम्यात दिल्लीची गाठ गतविजेत्या मुंबईसोबत पडणार आहे. त्यामुळे दिल्लीसमोर मुंबईचे तगडे आव्हान असणार आहे. या सामन्यात कोणता संघ वरचढ ठरणार, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

संबंधित बातम्या 

DC vs PBKS, IPL 2021 Match 11 Result | ‘गब्बर’ शिखर धवनची शानदार खेळी, दिल्लीचा पंजाबवर 6 विकेट्सने दमदार विजय

RCB vs KKR, IPL 2021 Match 10 Result | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा सलग तिसरा विजय, कोलकातावर 38 धावांनी शानदार विजय

(ipl 2021 dc vs pbks delhi capitals shikhar dhawan scored 92 runs against punjab kings)

Non Stop LIVE Update
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.