वर्ल्ड कप विनर कॅप्टनचा साधेपणा, 65 कोटींचा मालक, थेट जमिनीवर बसून सूर्यकुमार यादव याने मारला मटणावर ताव, तो व्हिडीओ व्हायरल..
वर्ल्ड कप विनर कॅप्टन सूर्यकुमारचं साधेपणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ,65 कोटींचा मालक असतानाही थेट जमिनीवर बसून सूर्यकुमार यादव मटणावर ताव मारत आहे.

भारताचा माजी संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सूर्यकुमार यादव आणि त्याचे मित्र एका घरात नॉनव्हेज पार्टीवर ताव मारताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये क्रिकेटपटू सरफराज खान देखील दिसत आहे. या व्हिडिओची जोरदार चर्चा होत आहे. सूर्याने मोठेपणा बाजून ठेवून जमिनीवर बसून जेवणाचा आस्वाद घेतोय. 65 कोटींचा मालक असलेल्या सूर्यकुमार यादवचा साधेपणा अनेकांना आवडला आहे. सूर्यकुमार यादवचं चाहते, नेटकऱ्यांडून जोरदार कौतुक केलं जात आहे.
सूर्यकुमार या व्हायरल व्हिडिओमध्ये म्हणत आहे की, माझ्या बाजूला माणिक भाऊ बसले आहेत. त्यांनी आमच्यासाठी मटण बनवलं. दुसरे भाऊ आमच्यासाठी गरम गरम भाकऱ्या बनवत आहेत. माणिक भाऊने आमच्यासाठी चवीष्ट मटण बनवलं आहे. अगदी घरच्यासारखं बनवलंय, अस्सल देसी,’. सूर्यकुमार सहित या नॉनव्हेज पार्टीत सरफराज खान देखील दिसत आहे. एकीकडे सूर्यकुमार टीम इंडियात कमबॅक करण्याचा प्रयत्न करत आहे. तर सूर्यासारखा सरफराज देखील टीम इंडियामध्ये कमबॅक करण्यासाठी प्रयत्नशील आहे. सरफराज खानने म्हटलं की, जेवण खूप चांगलं बनवलं आहे. माझी बोलण्याची कोणतीच इच्छा नाही. बोलण्याऐवजी फक्त जेवण करावसं वाटत आहे. खूप खूप धन्यवाद’. सरफराज खाननंतर सूर्यकुमार यादवने देखील आभार मानले. अनेकांनी दोन्ही क्रिकेटपटूंच्या साधेपणाचं कौतुक केलंय.
हैदराबादविरोधात मुंबईच्या सूर्यकुमारची जबरदस्त खेळी
दरम्यान, टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव हा सध्या सैयद मुश्ताक अली ट्रॉफी 2026-27 खेळत आहे. या स्पर्धेत सूर्यकुमार यादव हा मुंबईच्या संघाकडून खेळत आहे. सूर्यकुमार हा मुंबईच्या संघाचं नेतृत्व करत आहे. त्याने हैदराबादच्या विरोधात जोरदार फलंदाजी केली. त्याने 21 चेंडूत 60 धावा ठोकल्या. सूर्याने या सामन्यात 15 दिवसांत अर्धशतक पूर्ण केलं. मुशीर खान यानेही आक्रमक फलंदाजी केली. त्याने 24 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 51 धावा ठोकल्या. सूर्यकुमार यादव आणि मुशीर खानने तिसऱ्या विकेटसाठी 23 चेंडूत 65 धावांची भागिदारी करत संघाला विजयी केलं.