T20 World Cup 2022 : सानिया मिर्झाच्या पतीला विश्वचषक संघातून वगळले, सोशल मीडियाच्या कमेंट वाचून…

ज्यावेळी पाकिस्तान टीम जाहीर झाला, त्यानंतर नेटकऱ्यांनी पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डावरती सडकून टीका केली आहे.

T20 World Cup 2022 : सानिया मिर्झाच्या पतीला विश्वचषक संघातून वगळले, सोशल मीडियाच्या कमेंट वाचून...
pakistan new team
| Updated on: Sep 16, 2022 | 10:40 AM

ऑस्ट्रेलियात (Australia) होणाऱ्या T20 World Cup 2022 साठी पाकिस्तानच्या (Pakistan) 15 खेळाडूंची निवड झाली. त्यामध्ये अनेक नावं वगळण्यात आल्याने पुन्हा हे प्रकरण आता चर्चेत आहे. मागच्या काही दिवसांपासून विश्वचषकात या खेळाडूंना संधी मिळेल अशी चाहते चर्चा करीत होते. परंतु आशिया चषकात (Asia cup 2022) पाकिस्तानच्या काही खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. त्यामुळे जुन्या खेळाडूंचा विचार करण्याAdd Newत आलेला नाही असा देखील नाराजीचा सूर सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

सानिया मिर्झाचा पती शोएब मलिक हा पाकिस्तानच्या टीमसाठी खूप वर्षांपासून खेळत आहे. परंतु त्याला नुकत्याच झालेल्या आशिया चषकातून देखील वगळण्यात आले होते. विश्वचषकासाठी त्याची निवड होईल अशी चाहत्यांची इच्छा होती.

ज्यावेळी पाकिस्तान टीम जाहीर झाला, त्यानंतर नेटकऱ्यांनी पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डावरती सडकून टीका केली आहे.