AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : 6 मॅचमध्ये फक्त 80 धावा..तरीही इंग्लंडच्या मनात टीम इंडियाच्या या खेळाडूची भिती, सेमीफायनलआधी सॅम करनचं मोठं वक्तव्य

IND vs ENG : भारत आणि इंग्लंडची टीम सलग तिसऱ्यांदा टी 20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये भिडणार आहे. याआधी दोघांनी प्रत्येकी 1-1 सामना जिंकला आहे. ICC च्या नॉक आउट सामन्यात दोन्ही टीम्स सहाव्यांदा आमने-सामने येतील.

IND vs ENG : 6 मॅचमध्ये फक्त 80 धावा..तरीही इंग्लंडच्या मनात टीम इंडियाच्या या खेळाडूची भिती, सेमीफायनलआधी सॅम करनचं मोठं वक्तव्य
England Team Image Credit source: PTI
| Updated on: Mar 05, 2026 | 9:22 AM
Share

T20 World Cup 2026 IND vs ENG SemiFinal : टी20 वर्ल्ड कप 2026 मधील दुसरा सेमीफायनल सामना आज होईल. भारत आणि इंग्लंडच्या टीममधील विजेता फायनलमध्ये प्रवेश करणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ही मॅच होणार आहे. या मॅचआधी इंग्लंडचा ऑलराऊंडर सॅम करन याने एक स्टेटमेंट दिलं आहे. भारताविरुद्ध होणाऱ्या सेमीफायनल मॅचआधी सॅम करनने टीम इंडियाचा ओपनर अभिषेक शर्माचं नाव घेतलं. त्याच्यापासून सर्तक राहिलं पाहिजे असं सॅम म्हणाला. या हाय-वोल्टेज सामन्याची आज सगळीकडे चर्चा आहे. फायनलमध्ये पोहोचण्याची दोन्ही टीम्सकडे चांगली संधी आहे. अभिषेक पासून असलेल्या धोक्याची आम्हाला कल्पना आहे. तो आज काही धमाकेदार इनिंग खेळणार नाही अशी अपेक्षा आहे असं सॅम करन म्हणाला.

अभिषेक शर्माला इंग्लंडची टीम अजिबात विसरणार नाही. कारण इंग्लंड विरुद्ध शेवटच्या टी20 सामन्यात वानखेडेवरच तो 54 चेंडूत 135 धावांची स्फोटक इनिंग खेळला होता. यात 13 सिक्स आणि 7 फोर होते. त्या सामन्यात भारताने इंग्लंडला 150 धावांनी हरवलं होतं. इंग्लंडसाठी टी20 इतिहासातील हा सर्वात मोठा पराभव होता. “अभिषेक पुन्हा आज अशी इनिंग खेळणार नाही अशी अपेक्षा आहे. पण आम्ही या सामन्यासाठी पूर्णपणे तयार आहोत. आमचं लक्ष गुरुवारच्या रात्रीवर आहे” असं सॅम करन प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणाला.

स्फोटक फलंदाजीने कधीही मॅचची दिशा बदलू शकतो

चालू टुर्नामेंटमध्ये अभिषेक शर्मा काही खास प्रदर्शन करु शकलेला नाही. त्याने सहा सामन्यात फक्त 80 धावा केल्या आहेत. झिम्बाब्वे विरुद्ध त्याने 30 चेंडूत 55 धावा ही एकमेव अर्धशतकी इनिंग खेळला. सुरुवातीच्या तीन सामन्यात तो शुन्यावर आऊट झाला. त्या शिवाय दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 12 चेंडूत 15 धावा आणि वेस्ट इंडिज विरुद्ध 11 चेंडूत 10 धावा केल्या. अभिषेक शर्मा फॉर्ममध्ये नाहीय, तरीही इंग्लंडच्या मनात त्याची भिती आहे. कारण तो त्याच्या स्फोटक फलंदाजीने कधीही मॅचची दिशा बदलू शकतो.

इंग्लिश टीमवर दबाव जास्त असेल

भारत आणि इंग्लंडची टीम सलग तिसऱ्यांदा टी 20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये भिडणार आहे. याआधी दोघांनी प्रत्येकी 1-1 सामना जिंकला आहे. ICC च्या नॉक आउट सामन्यात दोन्ही टीम्स सहाव्यांदा आमने-सामने येतील. मागच्या पाच सामन्यात तीन विजयासह टीम इंडिया आघाडीवर आहे. टीम इंडिया यावेळी आपल्या घरात खेळत आहे. त्यामुळे इंग्लिश टीमवर दबाव जास्त असेल. टीम इंडियाला विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे.

Follow Us
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?
पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
Rohit Pawar On MPSC Pepar Leak | पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? रोहित पवारांचा MPSC व्यवस्थेवर संताप
डीजे बंदीवरून राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत
Sanjay Raut | डीजे बंदीवरून संजय राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत म्हणत सरकारला घेरलं
आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया स
MPSC | आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया सुळे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आक्रमक
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
Gunratna Sadavarte | 15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! गुणरत्न सदावर्तेंचं उद्धव-राज ठाकरेंना थेट आव्हान; नाहीतर...
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....