IND vs NZ : जसप्रीत बुमराह वर्ल्ड क्लास बॉलर पण न्यूझीलंड समोर त्याच्या गोलंदाजीला काय धाड भरते, इतका हतबल होतो बूम-बूम
IND vs NZ : जसप्रीत बुमराह टीम इंडियाचा हुकूमी एक्का आहे. जसप्रीत बुमराहसमोर भल्या-भल्या फलंदाजांना धडकी भरते. पण तोच जसप्रीत बुमराह न्यूझीलंडसमोर खूप हतबल वाटतो. सध्या भारत आणि न्यूझीलंडमध्ये टेस्ट सीरीज सुरु आहे.

भारतीय क्रिकेटपटू जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीत एक धाक आहे. बुमराहची गोलंदाजी खेळणं जगातल्या कुठल्याही फलंदाजासाठी सोपं नाहीय. भरवाशाचा गोलंदाज ही बुमराहची ओळख आहे. टीम इंडियाने आतापर्यंत जेवढे मोठे विजय मिळवेलत, त्यात जसप्रीत बुमराहच योगदान खूप महत्वाचं होतं. क्रिकेटच्या मैदानात जसप्रीत बुमराह या नावाची एक दहशत आहे. पण न्यूझीलंडची टीम मात्र याला अपवाद आहे. न्यूझीलंडसमोर जसप्रीत बुमराह तितका धोकदायक वाटत नाही. कदाचित बुमराहचा सामना कसा करायचा, हे न्यूझीलंडच्या टीमला समजलं असावं. हे एकदा-दोनदा नाही, तर अनेकदा दिसून आलय. जसप्रीत बुमराह न्यूझीलंड टीमसमोर अनेकदा खूप हतबल वाटतो. खासकरुन टेस्ट मॅचमध्ये. तेच अन्य संघांविरुद्ध जसप्रीत बुमराहचे आकडे खूप जबरदस्त आहेत. पण न्यूझीलंड विरुद्ध बुमराह फुस्स होतो. आतापर्यंत न्यूझीलंड विरुद्ध 7 सामन्यात त्याने 14 विकेट घेतलेत.
बुमराहची टेस्ट क्रिकेटच्या करिअरमध्ये 20.09 बॉलिंग सरासरी राहिली आहे. न्यूझीलंड विरुद्ध हीच सरासरी 41.42 होते. म्हणजे दुप्पट होते. करिअरच्या स्ट्राइक रेट बद्दल बोलायचं झाल्यास बुमराह दर 44 व्या चेंडूनंतर विकेट काढतो. पण न्यूझीलंडसमोर तो खूप हतबल असतो. न्यूझीलंड विरुद्ध एक विकेट मिळवण्यासाठी त्याला 89 चेंडू फेकावे लागतात.
संपूर्ण इनिंगमध्ये एकही विकेट मिळवता आलेला नाही
न्यूझीलंड विरुद्ध आतापर्यंत 6 वेळा असं घडलय, जेव्हा बुमराहला संपूर्ण इनिंगमध्ये एकही विकेट मिळवता आलेला नाही. आज दुसऱ्या कसोटी सामन्यातही हेच दिसून आलं. आतापर्यंत एकदाही बुमराहला न्यूझीलंड विरुद्ध 5 विकेट घेता आलेले नाहीत. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड विरुद्ध बुमराहने हा कारनामा केलाय. न्यूझीलंड विरुद्ध बुमराहचा बेस्ट परफॉर्मन्स पहिल्या कसोटी सामन्यात पहायला मिळाला. त्यावेळी त्याने चार विकेट काढलेले. 68 ओव्हर टाकून त्याने चार विकेट काढलेले.
टिम साऊदी जसप्रीत बुमराहबद्दल काय बोललेला?
न्यूझीलंडचा माजी कर्णधार टिम साऊदी या दौऱ्याआधी जसप्रीत बुमराहबद्दल एक गोष्ट बोलला होता. “बुमराहचा सामना कसा करायचा, हे न्यूझीलंडला ठाऊक आहे” साऊदीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021 च्या फायनलचा उल्लेख केलेला. तिथे बुमराहला न्यूझीलंड विरुद्ध एकही विकेट मिळाला नव्हता. न्यूझीलंडने तो सामना जिंकलेला. साऊदीने मोहम्मद सिराजचा उल्लेख केला. सिराज न्यूझीलंडच्या फलंदाजांना हैराण करु शकतो. पण मॅनेजमेंट त्याला सहावा गोलंदाज समजतं. दोन्ही टेस्टमधून सिराजला बाहेर ठेवण्यात आलं. अंशुल कंबोज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर बराड आणि आकाश दीपला संधी दिली.