T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाच्या 20 जणांची नावं निश्चित! पाहा संभावित यादी

Team India T20 WC Squad : टीम इंडियाने पहिलाच आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2007 साली जिंकला होता. तेव्हापासून ते आतापर्यंत टीम इंडियाला टी 20 वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. त्यामुळे यंदा रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाला अनेक वर्षांची प्रतिक्षा संपवण्याची संधी आहे.

T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाच्या 20 जणांची नावं निश्चित! पाहा संभावित यादी
team india t20i world cup national anthem,Image Credit source: AFP
Follow us
| Updated on: Apr 17, 2024 | 8:19 PM

आयपीएलच्या 17 व्या मोसमाचा थरार सुरु असताना टी 20 वर्ल्ड कपबाबत मोठी अपडेट आली आहे. आगामी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेला 1 जूनपासून सुरुवात होणार आहे. या टी 20 स्पर्धेचं आयोजन हे यूएसए आणि वेस्ट इंडिजमध्ये करण्यात आलं आहे. टी 20 वर्ल्ड कपमध्ये एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. आयसीसीने या स्पर्धेसाठी 20 संघांना आपला स्क्वॉड जाहीर करण्यासाठी 1 मे ही अखेरची तारीख दिली आहे. या दरम्यान टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाच्या 20 खेळाडूंची नावं जवळपास निश्चित झाली आहेत. टीम इंडियाच्या मेन स्क्वॉडमध्ये 15 मुख्य आणि 5 राखीव खेळाडू असणार आहेत. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, 20 संभावित खेळाडूंची नावं निश्चित आहेत.

टी 20 वर्ल्ड कपसाठी एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत 20 खेळाडूंच्या नावावर शिक्कामोर्तब केला जाणार आहे. आयपीएलच्या 17 व्या मोसमातील कामगिरीच्या जोरावर कोणत्याही खेळाडूची निवड होणार नाहीय. तसेच जे खेळाडू आतापर्यंत टीम इंडियासाठी खेळले आहेत, त्यांनाच संधी मिळणार आहे, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआयला दिली. त्यामुळे आता आयपीएलमध्ये चमकदार कामगिरीमुळे आपली वर्ल्ड कपसाठी निवड होईल ही आशा मावळली आहे. बीसीसीआयने याआधी आयपीएलमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर अनेक युवा खेळाडूंना टीम इंडियात खेळण्याची संधी दिली आहे. या मुद्द्यावरुन बीसीसीआयवर टीकाही करण्यात आली आहे. त्यामुळे बीसीसीआयने ही खबरदारी घेतली आहे.

टीम इंडियाचं टी 20 वर्ल्ड कप वेळापत्रक

टी 20 वर्ल्ड कपमध्ये एकूण 20 संघ आहेत. त्यानुसार 5-5 नुसार 20 संघ 4 गटात विभागण्यात आले आहेत. टीम इंडिया ए ग्रुपमध्ये आहे. टीम इंडियासह या ग्रुपमध्ये पाकिस्तान, कॅनेडा, यजमान यूएसए आणि आयर्लंडचा समावेश आहे. त्यानुसार प्रत्येक टीम साखळी फेरीत 4 सामने खेळणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना हा आयर्लंड विरुद्ध असणार आहे. तर अखेरचा सामना कॅनेडा विरुद्ध होणार आहे.

वाचा सविस्तर बातमी

विरुद्ध आयर्लंड, 5 जून

विरुद्ध पाकिस्तान, 9 जून

विरुद्ध यूएसए, 12 जून

विरुद्ध कॅनेडा, 15 जून

टी 20 वर्ल्ड कपसाठी 20 संभावित खेळाडूंची नावं : रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंह, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, ऋषभ पंत, केएल राहुल, संजू सॅमसन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह आणि आवेश खान.

Non Stop LIVE Update
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय.
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण.
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी.
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय.
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख.
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?.
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?.
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला.
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका.