शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, रस्ते मार्गाने पुण्याच्या दिशेला रवाना

राजगडमध्ये शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झालाय. त्यामुळे शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे रस्ते मार्गाने पुण्याच्या दिशेला रवाना झाले आहेत.

शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, रस्ते मार्गाने पुण्याच्या दिशेला रवाना
शरद पवारImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 30, 2024 | 6:26 PM

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हे लोकसभेच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातील विविध मतदारसंघांचा दौरा करत आहेत. राज्यातील वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये शरद पवारांच्या सभा पार पडत आहे. शरद पवार आज पुण्याच्या राजगड दौऱ्यावर होते. यानंतर ते पुण्याच्या वारजे येथे सभेसाठी जाणार असल्याचं नियोजित आहे. या सभेसाठी शरद पवार राजगडमधून निघणार असतानाच एक महत्त्वाची माहिती समोर आली. शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे राजगड येथे हेलिकॉटरला सोडून शरद पवार चारचाकीतून रस्ते मार्गाने पुण्याच्या दिशेला रवाना झाले आहेत.

राजगडमध्ये शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झालाय. त्यामुळे शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे रस्ते मार्गाने पुण्याच्या दिशेला रवाना झाले आहेत. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी शरद पवारांची आज पुण्यातील वारजे येथे सभा होणार आहे. वारजे हे खडकवासला भागात आहे. या वारजे येथे सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आलीय. या सभेसाठी निघत असताना राजगडमध्ये शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यानंतर शरद पवार रस्ते मार्गाने पुण्यासाठी रवाना झाले आहेत.

नुकतंच अमित शाह यांचं हेलिकॉप्टर हवेत भिरभिरलं

लोकसभा निवडणुकीमुळे आता देशातील बड्या नेत्यांचा हेलिकॉप्टरचा वापर करावा लागत आहे. फक्त शरद पवार हेच नाहीत तर देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हेलिकॉप्टरने प्रवास करतात. सध्या उन्हाळ्यामुळे तापमानातही वाढ झाली आहे. तर काही भागांमध्ये अवकाळी पाऊस पडतोय. त्यामुळे वातावरणातही बदल होत आहे. या सगळ्यांचा परिणाम हेलिकॉप्टरवरही होऊ शकतो. यामुळे हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड होऊ शकतो. नुकतंच अमित शाह यांच्या हेलिकॉप्टरने बिहारमध्ये टेक ऑफ करत असताना हवेत घिरट्या मारल्याची घटना घडली होती. पण पायलटच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली होती. संबंधित घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता.

Non Stop LIVE Update
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी.
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू.
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका.
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका.
तर मी निवृत्ती घेतली असती, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
तर मी निवृत्ती घेतली असती, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?.
4 जूनला समजेल शो कोणाचा... देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका कुणावर?
4 जूनला समजेल शो कोणाचा... देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका कुणावर?.
मोदींना वारंवार महाराष्ट्रात का यावं लागतंय? फडणवीसांनी दिलं थेट उत्तर
मोदींना वारंवार महाराष्ट्रात का यावं लागतंय? फडणवीसांनी दिलं थेट उत्तर.
उद्धव ठाकरेच घाटकोपर दुर्घटनेला जबाबदार, कारण... फडणवीसांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरेच घाटकोपर दुर्घटनेला जबाबदार, कारण... फडणवीसांचा हल्लाबोल.
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल.
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ...
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ....