T20 World Cup 2022 : टीम इंडियाने झिम्बाब्वेला हलक्यात घेऊ नये, दिग्गज खेळाडूचा सल्ला

पाकिस्तान टीमचा झिम्बाब्वेने एका धावेने पराभव केल्यापासून पाकिस्तानच्या खेळाडूंवर जोरदार टीका होत आहे.

T20 World Cup 2022 : टीम इंडियाने झिम्बाब्वेला हलक्यात घेऊ नये, दिग्गज खेळाडूचा सल्ला
Team india
Image Credit source: AFP
| Updated on: Oct 29, 2022 | 9:21 AM

मेलबर्न : टीम इंडियाने विश्वचषक (T20 World Cup 2022) स्पर्धेत दोन्ही मॅचमध्ये विजय मिळविला आहे. त्यामुळे टीम इंडिया (IND) यंदाचा विश्वचषक जिंकू शकते अशी चर्चा सोशल मीडियावर चाहते करीत आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या (PAK) रोमांचक मॅचमध्ये टीम इंडियाने चार विकेट राखून विजय मिळविला. तर दुसऱ्या नेदरलॅंडविरुद्धच्या मॅचमध्ये सुद्धा टीम इंडियाने चांगल्या खेळीमुळे विजय मिळविला आहे. टीम इंडियाचे तीन फलंदाज सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहेत.

पाकिस्तान टीमचा झिम्बाब्वेने एका धावेने पराभव केल्यापासून पाकिस्तानच्या खेळाडूंवर जोरदार टीका होत आहे. तसेच झिम्बाब्वेच्या खेळाडूंचं कौतुक देखील चाहते करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. झिम्बाब्वेचे खेळाडू सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असल्यामुळे टीम इंडियाने त्यांच्याविरुद्धच्या मॅचमध्ये सावधगिरी बाळगावी असं विधान टीम इंडियाचे माजी खेळाडू सुनिल गावस्कर यांनी सांगितले आहे.

झिम्बाब्वेच्या खेळाडूंनी पाकिस्तानचा पराभव केल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्धच्या मॅचमध्ये खेळताना टीम इंडियाला अधिक काळजीपुर्वक खेळी करावी लागले. तसेच पाकिस्तान टीम यापुढचे सामने जिंकणं तितकं सोप्प नाही. आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये पाकिस्तान टीमची खरी ताकद कळेल असं देखील विधान सुनिल गावस्कर यांनी केलं आहे.