
India Squad for West Indies Test :वेस्ट इंडिज सीरीजसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. कॅप्टनपदी शुबमन गिल कायम आहे. रवींद्र जाडेजाला उपकर्णधार बनवण्यात आलं आहे. सरफराज खानला टीममध्ये स्थान मिळालेलं नाही. देवदत्त पडिक्कलने टीम इंडियात पुनरागमन केलय. मोठी बातमी ही आहे की, करुण नायर, साई सुदर्शन, आकाशदीप यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. करुण नायर, साई सुदर्शन इंग्लंड सीरीजमध्ये फ्लॉप ठरले होते. चार कसोटी सामन्यात ते फक्त एक अर्धशतक झळकवू शकले होते विकेटकीपर ऋषभ पंत फिट नाहीय. म्हणून त्याच्या जागी नारायण जगदीशनचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. अक्षर पटेलने सुद्धा टीममध्ये पुनरागमन केलय.
भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये दोन टेस्ट मॅचच्या सीरीजला 2 ऑक्टोंबरपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये होईल. दुसरी टेस्ट मॅच दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअममध्ये 10 ऑक्टोंबरपासून होईल. वेस्ट इंडिजचे कोच डॅरन सॅमी यांनी सीरीज सुरु होण्याआधीच टीम इंडियाला इशाऱ्या, इशाऱ्यात आव्हान दिलं आहे. जर, न्यूझीलंडची टीम भारताला त्यांच्याच देशात हरवू शकते, तर आम्ही सुद्धा तसच करु शकतो.
भारताची टेस्ट टीम : शुबमन गिल (कॅप्टन), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नीतीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव आणि नारायण जगदीशन.
वेस्टइंडीजची टेस्ट टीम : केवरॉन एंडरसन, एलिक अथानाजे, जॉन कॅम्पबल, तेगनारायण चंद्रपॉल, शे होप, टेविन इमलाच, ब्रँडन किंग, रॉस्टन चेज़ (कॅप्टन), जस्टिन ग्रीव्स, खारे पियरे, जॉन वॉरिकन, अल्जारी जोसफ, शेमार जोसफ, एंडरसन फिलिप आणि जेडन सील्स.
भारत-वेस्टइंडीजमध्ये कोणी किती टेस्ट मॅच जिंकल्यात?
भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये आतापर्यंत 100 कसोटी सामने झाले आहेत. भारताने एकूण 23 कसोटी सामने जिंकलेत. वेस्ट इंडिजला 30 मध्ये विजय मिळाला आहे. दोन्ही देशात 47 टेस्ट मॅच ड्रॉ झाल्यात. भारताने वेस्ट इंडिजला सलग 9 टेस्ट सीरीजमध्ये हरवलं आहे. वेस्ट इंडिजच्या टीमने भारतात शेवटची टेस्ट सीरीज 2002 साली जिंकलेली. मागच्या पाच वर्षात तीन टेस्ट सीरीजमध्ये भारताने वेस्ट इंडिजवर क्लीन स्वीप विजय मिळवला आहे.